नोकरीसाठी खूप वणवण भटकावं लागतं हे ज्याला नोकरी नाही त्याला चांगलं माहित आहे. अशीच एक बातमी व्हायरल झालीये ज्यात नोकरीच्या शोधात एक 47 वर्षीय व्यक्ती सुमारे 1000 किलोमीटर चालत गेल्याची घटना समोर आलीये. 11 दिवसांच्या या प्रवासात त्याच्या दोन मुलीही त्याच्यासोबत होत्या. या दरम्यान त्यांनी मंदिरे आणि पेट्रोल पंपावर रात्र काढली. मात्र वाटेत अनोळखी तरुण सापडल्याने त्या व्यक्तीचा शोध पूर्ण झाला. प्रकरण थायलंडचे आहे.
‘थेगर’च्या वृत्तानुसार, 47 वर्षीय नोराफत आपल्या दोन मुलींना आधार देण्यासाठी कामाच्या शोधात होता. परंतु, नोराफत राहत असलेल्या ठिकाणी त्याला कोणतेही काम मिळत नव्हते. त्यामुळे 11 डिसेंबर रोजी नोकरीच्या शोधात आपल्या मुलींना घेऊन तो सतुन शहरातून रायोंग शहराकडे निघाला.
नोराफतकडे ना पैसे होते ना वाहन. तो पायी एका शहरातून दुसऱ्या शहरात जात होता. 11 दिवसांत त्याने सुमारे 1 हजार किमी अंतर पार केले. 22 डिसेंबर रोजी ते रायोंग सिटीला पोहोचले.
वाटेत नोराफत आणि त्यांच्या 10 व 12 वर्षांच्या दोन मुलींनी मंदिरे, पेट्रोल पंप आणि निवारा गृहांमध्ये आश्रय घेतला. या दरम्यान, प्लूक दाईंग रेस्क्यू टीमच्या (Pluak Daeng Rescue Team) सरावुत पूममारिन नावाच्या व्यक्तीची भेट घेतली. सरावुत हा निराधारांना मदत करणाऱ्या संस्थेशी संबंधित आहे.
या कुटुंबाबद्दल एका दुचाकीस्वाराने आपल्याला माहिती दिली होती, असे सरावुतने प्रसारमाध्यमांना सांगितले. त्याने कुटुंब रस्त्यावर चालताना पाहिले, त्यानंतर दुचाकीस्वाराने त्याला कुटुंबाला मदत करण्याचे आवाहन केले.
सरावुतला नोराफतचे कुटुंब प्लुक दाएंग जिल्ह्यातील एका शॉपिंग मॉलसमोर बसलेले आढळले. त्याला भेटल्यानंतर त्याने नोराफत यांना एका बांधकामाच्या ठिकाणी नोकरी मिळवून दिली. याशिवाय कुटुंबाला राहण्यासाठी खोलीची व्यवस्था करण्यात आली होती आणि मुलींना अभ्यासासाठी शाळेचीही व्यवस्था करण्यात आली होती.