ओ हो दादी तो छा गयी! स्टेशनवरचे लोक बघतच राहिले, मस्त मगन आजीबाई, थांबल्या नाहीत! बघा…

| Updated on: Sep 14, 2022 | 5:28 PM

असाच एक व्हिडिओ पाहून तुमच्या चेहऱ्यावर सुद्धा हसू येईल. हा व्हिडिओ मेट्रो स्टेशनवर शूट करण्यात आलाय.या स्टेशनवर अनेक लोकं मेट्रोची वाट पाहतायात.

ओ हो दादी तो छा गयी! स्टेशनवरचे लोक बघतच राहिले, मस्त मगन आजीबाई, थांबल्या नाहीत! बघा...
Grandmaa Dancing Viral Video
Image Credit source: Social Media
Follow us on

सोशल मीडियावर एकापेक्षा एक मजेदार व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होतात. असाच एक व्हिडिओ पाहून तुमच्या चेहऱ्यावर सुद्धा हसू येईल. हा व्हिडिओ मेट्रो स्टेशनवर शूट करण्यात आलाय. या स्टेशनवर अनेक लोकं मेट्रोची (Metro Station) वाट पाहतायात. अशात अचानक एक आजीबाई नाचू लागते. हे दृश्य इतकं भावुक त्याचबरोबर मजेदार आहे. तुम्ही हा व्हिडीओ नक्की बघा तुम्हालाही नक्की आवडेल. या व्हिडीओमध्ये आजीला डान्स (Dance) करताना पाहा… दादीला डान्स स्टेप्स करताना पाहून स्टेशनवर उभे असणारे सगळेच लोक आश्चर्यचकित होतात आणि हा क्षण आपल्या मोबाइल फोनमध्ये कैद करतात.

आधी हा व्हायरल व्हिडिओ बघा…

या वयात आजीला असं मस्त मगन होऊन नाचताना पाहून सर्वांनाच धक्का बसलाय. आजीचा डान्स पाहून अनेक सोशल मीडिया यूजर्सना प्रतिक्रिया देण्यापासून स्वतःला रोखता आलं नाही.

अनेक लोक तिचे चाहतेही बनलेत. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलाय.

आतापर्यंत 1.5 दशलक्षाहून अधिक वेळा हा व्हिडीओ पाहिला गेलाय. इतकंच नाही तर हजारो लोकांनी हा व्हिडिओ लाईकही केला आहे. कमेंट सेक्शनमध्येही लोक दादी अम्मांचं कौतुक करताना दिसतायत.