मुंबई: भारतात सगळ्यात रंजक गोष्ट जर कुठली असेल तर ती म्हणजे इथले मजूर आणि त्यांचा जुगाड. ज्या पद्धतीनं इथे माणसांच्या बाळाचा वापर केला जातो, डोक्याचा वापर केला जातो त्या पद्धतीनं जगात अजून कुठेही याचा वापर केला जात नाही. या योग्य वापरामुळेच इथे मशिन्सचा फारसा वापर केला जात नाही, इथे माणसाचाच वापर केला जातो. आपण असंही म्हणू शकतो की इथे मशिन्सचा वापर केला जात नाही म्हणूनच इथे माणसाचा मजूर म्हणून पुरेपूर वापर केला जातो. हे सगळं बोलायचं कारण काय? मोठ्या शहराच्या ठिकाणी मजुरांचा जुगाड पाहण्यासारखा असतो. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.
अशक्य काम कुठेही आणि केव्हाही लवकर पूर्ण करण्याच्या जुगाड तंत्रज्ञानासाठी भारत प्रसिद्ध आहे. इथे जर एखादा अभियंता असता तर जुगाड केला नसता. अनेकदा काही लोक आपले काम देशी पद्धतीने करून घेतात आणि लोक बघतच राहतात. सोशल मीडियावर शेतकरी आणि मजुरांनी वापरलेला देशी जुगाड सगळ्यांनाच खूप आवडतो. मजुरी आणि शेतीमध्ये खूप शारीरिक श्रम केले जातात मग अशा परिस्थिती हे शारीरिक श्रम करणारे लोकच जुगाड काढतात. आता या व्हिडीओ मधला जुगाड तर बघा.
व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही पाहू शकता की अनेक लोक एकत्र येऊन सिमेंट शीट पहिल्या मजल्यावर पोहोचवत आहेत. तसं पाहिलं तर लक्षात येईल की, एका व्यक्तीने दोरीने सिमेंट शीट बांधलं आहे आणि मग ते रस्सी आणि बांबूच्या साहाय्याने उचलले जात आहे. मात्र, हे उचलण्यासाठी दोन मुले एका नंतर एक दोरी ओढतात आणि वर उभी असलेली दोन माणसे त्याला पकडतात. एका सेकंदात जड सिमेंटशीट दोरी आणि बांबूच्या साहाय्याने वर पोहचवलं जातं. हा जुगाड खूपच भारी आहे. बिलाल अहमद नावाच्या युजरने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला असून आतापर्यंत शेकडो लोकांनी त्याला लाइक केले आहे, तर अनेकांनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.