#indvspak: भारत-पाकिस्तान 24 ऑक्टोबरला आमनेसामने, टी-20 सामन्यामुळे सोशल मीडियावर धुमाकूळ

| Updated on: Aug 04, 2021 | 6:10 PM

टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान 24 ऑक्टोबर रोजी एकमेकांसमोर येण्याची शक्यता आहे.

#indvspak: भारत-पाकिस्तान 24 ऑक्टोबरला आमनेसामने, टी-20 सामन्यामुळे सोशल मीडियावर धुमाकूळ
INDIA VS PAKISTAN CRICKET MATCH
Follow us on

मुंबई : आपल्या देशात क्रिकेट रसिकांची कमी नाही. त्यातही भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना असेल तर गोष्ट काही वेगळीच असते. पाकिस्तानचा पराभव आणि भारताचा दणदणीत विजय व्हावा यासाठी लोक देव पाण्यात घालून बसलेले असतात. हाच योगायोग पुन्हा एकदा येण्याची शक्यता आहे. टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान 24 ऑक्टोबर रोजी एकमेकांसमोर येण्याची शक्यता आहे. याच संभाव्य सामन्यामुळे सोशल मीडियावरील वातावरण सध्या तापले आहे. या सामन्याला घेऊन नेटकरी विविध प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. (India vs Pakistan T-20 world cup match will be on 24 October funny memes went viral on social media)

येत्या 24 ऑक्टोबरला भारत पाकिस्तान आमनेसामने 

भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये सामना असला की लोकांमध्ये वीरश्री संचारते. पाकिस्तानची हार व्हावी अशी इच्छा बाळगून लोक संपूर्ण सामना पाहत बसतात. यामध्ये भारत सामना जिंकलाच तर नेटकरी भारतीय खेळाडूंना अक्षरश: डोक्यावर घेतात. मात्र, हाच सामना भारताने गमावल्यानंतर मात्र टीकासुद्धा केली जाते. सोशल मीडियावरील वातावरण तर चांगलंच गरम झालेलं असतं. याच पार्श्वभूमीवर येत्या 24 ऑक्टोबरला भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे. ही खबर बाहेर येताच सोशल मीडियावर #INDvsPAK हॅशटॅग ट्रेंडिंगवर आला आहे.

सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस

काही नेटकऱ्यांनी ही बातमी समजताच शेवटी तो दिवस आलाच, असे मजेदार मिम शेअर केले आहे. तर एका नेटकऱ्याने 24 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय सुट्टी जाहीर करण्याची मागणी केली आहे. ट्विटर तसेच इतर समाजमाध्यमांवर हे मिम्स सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत.

समाने UAE मध्ये खेळवण्याचे ठरवण्यात आले

दरम्यान, यावेळचा टी-20 वर्ल्ड कप भारतात खेळवला जाणार होता. मात्र, सध्याची कोरोना स्थिती पाहता ICCने आपला निर्णय बदलत टी-20 वर्ल्ड कप सीरिजचे सर्व समाने UAE मध्ये खेळवण्याचे ठरवण्यात आले आहे. अद्याप ICC ने वर्ल्ड कपचे पूर्ण वेळापत्रक शेअर केलेले नाही. मात्र, 24 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्याची आतापासूनच चर्चा सुरु आहे.

इतर बातम्या :

Video | 8 फुटांची मगर थेट घरात घुसली, नंतर जे घडलं ते एकदा पाहाच !

#Justiceforcabdriver: कॅब ड्रायव्हरला मारणाऱ्या तरुणीविरोधात सोशल मीडियावर रोष, ‘त्या’ दिवशी नेमकं काय घडलं ?

‘प्रँक’से करेंगे सबका स्वागत, दोन तरुणांचा भलताच प्रँक, Video पाहा, हसून लोटपोट व्हाल!

(India vs Pakistan T-20 world cup match will be on 24 October funny memes went viral on social media)