रेल्वे ट्रॅकवर खाली झोपला, वरून भरधाव वेगाने रेल्वे गेली…काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ!

| Updated on: Jul 07, 2023 | 11:34 AM

अनेक व्हिडीओ असतात जे बघून आपल्याला धक्का बसतो. काही व्हिडीओ तर लोकांच्या अक्षरशः जीवावर बेतणारे असतात. बरेचदा तर यावर रेल्वे पोलिसच कारवाई करतात. लोकं सुद्धा विशेषतः तरुण मंडळी, फेमस होण्यासाठी वाट्टेल ते व्हिडीओ बनवतात. असाच एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय.

रेल्वे ट्रॅकवर खाली झोपला, वरून भरधाव वेगाने रेल्वे गेली...काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ!
Railway viral video
Follow us on

मुंबई: भारतात रेल्वेच्या संबंधित अनेक गोष्टी नेहमीच व्हायरल होत असतात. कधी कुणी काहीतरी स्टंट करतं, तर कधी कुणाचा अपघात होतो. असे अनेक व्हिडीओ असतात जे बघून आपल्याला धक्का बसतो. काही व्हिडीओ तर लोकांच्या अक्षरशः जीवावर बेतणारे असतात. बरेचदा तर यावर रेल्वे पोलिसच कारवाई करतात. लोकं सुद्धा विशेषतः तरुण मंडळी, फेमस होण्यासाठी वाट्टेल ते व्हिडीओ बनवतात. असाच एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ अंगावर काटा आणणारा आहे. शेवटी रेल्वे या मुलाच्या अंगावरून जाताना दिसते. त्याच्या सोबत त्याचा साथीदार हा व्हिडीओ शूट करताना दिसतोय.

हा व्हायरल झालेला व्हिडीओ कोणत्या ठिकाणाचा आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. एक तरुण मुलगा रेल्वे ट्रॅकवर खाली झोपलेला दिसतोय. रेल्वे येते तरी हा तरुण तिथून उठत नाही. रेल्वे येताना बघून आपल्या काळजाचे ठोके चुकतात पण तो मुलगा मात्र जागचा हालत नाही. हा स्टंट जीवावर बेतणारा आहे. ज्याने हा व्हिडीओ शेअर केलाय त्याने या मुलावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केलीये. हा व्हिडीओ शेअर करत त्याने कॅप्शन मध्ये लिहिलं, “व्हायरल व्हिडिओ कुठला आहे हे मला माहित नाही. परंतु लोक अशा प्रकारे व्हिडिओ बनवतात जे पूर्णपणे चुकीचे आहे. रेल्वे पोलिसांनी अशा लोकांवर कठोर कारवाई केली पाहिजे जेणेकरून ते भविष्यात असे करण्यापूर्वी लोक शंभर वेळा विचार करतील.” या कॅप्शन सहित या व्यक्तीने केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वेलाही टॅग केलंय.

या व्हिडिओला 6 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यावर लोकांनी कमेंट करताना लिहिलंय की, “त्याला भारतीय रेल्वे कायद्यानुसार तुरुंगात जावे लागेल. भविष्यात असे करण्यापूर्वी दोनदा विचार करावा, यासाठी अशा प्रवृत्तींमध्ये सहभागी असलेल्यांवर कडक कारवाई व्हायला हवी.”