नवी दिल्ली : ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वेभाड्याबाबत एक महत्वाची बातमी आहे. सध्या सोशल मीडियात रेल्वेच्या बातमीची जोरदार चर्चा सुरु आहे. रेल्वे प्रवासादरम्यान झोपण्यासाठी भारतीय रेल्वे अतिरिक्त भाडे आकारणार असल्याची बातमी व्हायरल झाली आहे. वास्तविक, काही मीडिया रिपोर्ट्स दावा करीत आहेत की भारतीय रेल्वे त्याच्या सिस्टममध्ये काही बदल तयार करीत आहे. ज्यामध्ये प्रवासादरम्यान झोपणाऱ्या प्रवाशांकडून जादा भाडे आकारण्याचीही चर्चा आहे.
व्हायरल रिपोर्टनुसार प्रवाशांना जर ट्रेनमध्ये झोपून प्रवास करायचा असेल तर रेल्वे त्यांच्याकडून दहा टक्के अधिक भाडे आकारू शकते. तथापि, रेल्वेने या मार्गाने भाडे वाढविण्याची कोणतीही योजना केलेली नाही. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या प्रेस इन्फर्मेशन ब्युरो (पीआयबी) या संस्थेने या दाव्याची पडताळणी करुन सत्यता तपासले आहे. (indian railway Will charge extra 10 per cent fare if you sleep in the train? Know what is truth)
याबाबत माहिती देताना पीआयबीने ट्विट केले की काही माध्यमांच्या वृत्तानुसार असा दावा केला जात आहे की प्रवाशांना ट्रेनमध्ये झोपून प्रवास करण्याची इच्छा असेल तर रेल्वे त्यांच्याकडून 10% अधिक भाडे आकारु शकते. हा दावा दिशाभूल करणारा आहे. ही रेल्वे मंडळाला देण्यात आलेली केवळ एक सूचना होती. रेल्वे मंत्रालयाने अशी कोणतीही घोषणा केलेली नाही.
ज्या बातमीबाबत पीआयबीने तथ्य तपासणी केली आहे त्यामध्ये बेडरोलचे भाडे वाढविण्याचा उल्लेख आहे. बेडरोलचे भाडे 60 रुपयांपर्यंत वाढवता येऊ शकते, यामुळे रेल्वेला कोट्यवधी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळेल. सध्या प्रवाशांकडून बेडरोलचे 25 रुपये भाडे आकारले जात आहे. (indian railway Will charge extra 10 per cent fare if you sleep in the train? Know what is truth)
Govinda | ‘मीसुद्धा घराणेशाहीचा बळी ठरलो होतो’, रुपेरी पडद्यापासून दूर असणाऱ्या गोविंदाच्या संतापाचा उद्रेक!#Govinda | #bollywood | #nepotism | #Entertainment https://t.co/EdIwqDBNlI
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 15, 2021
इतर बातम्या
Income Tax : फक्त गृह कर्जच नव्हेच, तर शिक्षण कर्जातदेखील मिळते कर्जाची सूट, नियम काय सांगतात?
अवघ्या दोन फुटांच्या अजीमशी लग्नासाठी तब्बल डझनभर मुलींची रांग, सलमानकडूनही भेटीचा प्रस्ताव!