रेल्वे स्टेशनवर अनेक वेळा अशा घटना घडतात, व्हिडिओ समोर आल्यावर लोकांना आश्चर्याचा धक्का बसतो. इंटरनेटवर एक व्हिडिओ समोर आला आहे, जो व्हिडीओ पाहून लोक खूप मजा घेतायत. नुकतंच रेल्वे रुळाच्या मधोमध असलेला पाईप फुटतो, नेमका हाच व्हिडीओ व्हायरल झालाय. @Gulzar_sahab नावाच्या ट्विटर पेजवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक ट्रेन जवळून जाताना दिसेल.
गाडी जाणार असताना रुळाजवळची तुटलेली पाइपलाइन खराब झाली. पिवळ्या रंगाचा पाईप पाण्याच्या दाबाने हवेत उसळत होता, जणू काही सापच आहे. त्याचवेळी ट्रेन मध्येच आली आणि मग ट्रेनवर हे पाणी पडायला लागलं.
अचानक ट्रेनमध्ये बसलेल्या प्रवाशांवर पाणी पडू लागले. प्रवाशांनाही काही सेकंद काय घडतंय ते समजलं नाही. रेल्वे वेगाने धावत असून सर्वांवर पाणी पडतंय. हा व्हिडीओ बघून लोक कमेंट करतायत, “भारतात स्वागत आहे”. खरं तर हे फक्त भारतात होऊ शकतं असं लोकांचं म्हणणं आहे.
Welcome to India ?❤️ pic.twitter.com/YatPt8CChs
— ज़िन्दगी गुलज़ार है ! (@Gulzar_sahab) December 13, 2022
हा व्हिडिओ एक दिवसापूर्वी शेअर करण्यात आला होता. शेअर केल्यापासून आठ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आणि त्याला शेकडो लाइक्स आणि अनेक प्रतिक्रिया मिळाल्या.
ट्विटरवर व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर एका युझरने गंमतीने लिहिले, ‘जपानने पुरवलेली ऑटोमॅटिक ट्रेन वॉशिंग मशीन’