तुम्हाला आठवतं तुम्ही वयाच्या कितव्या वर्षी वेस्टर्न टॉयलेट पहिल्यांदा पाहिलं होतं? जसे जसे आपण मोठे होत गेलो तसा वेस्टर्न टॉयलेटचा वापर जरा जास्तच होत गेला नाही का? आता तर जिथे बघावं तिथे वेस्टर्न टॉयलेट. पण मग तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का की भारतीय आणि वेस्टर्न टॉयलेटमध्ये सगळ्यात जास्त फायदेशीर टॉयलेट कोणतं? अनेक अर्थांनी वेस्टर्न टॉयलेटपेक्षा भारतीय टॉयलेट चांगली आहे. वेस्टर्न सीट तुम्हाला आजारीही पाडू शकते कारण या वेस्टर्न टॉयलेटवर बसताना शरीराची हालचाल होत नाही. त्याचबरोबर भारतीय टॉयलेट सीटमध्ये पूर्ण शरीराची हालचाल होते. वेस्टर्न टॉयलेटमध्ये संसर्ग होण्याचा धोकाही जास्त असतो कारण त्याचा वापर करताना आपली त्वचा वेस्टर्न टॉयलेट सीटच्या संपर्कात येते.
जेव्हा एखादी व्यक्ती भारतीय शौचालयाचा वापर करते तेव्हा त्याच्या शरीरात अधिक हालचाल होते, असं एका संशोधनातून समोर आलं आहे. पंज्यापासून डोक्यापर्यंत संपूर्ण शरीरावर दबाव असतो, पण वेस्टर्न सीट आरामदायी असते, असा आराम आपल्याला आजारीही पाडू शकतं.
याच बसण्याच्या पद्धतीमुळे पोटात दबाव निर्माण होतो त्यामुळेच भारतीय शौचालयात फ्रेश होण्यासाठी कमी वेळ लागतो. पोट साफ करण्यासाठी 3 ते 4 मिनिटे लागतात. याउलट वेस्टर्न सीटवर 5 ते 7 मिनिटे लागतात. अनेक वेळा लोकांचं पोट नीट साफ होत नाही. भारतीय शौचालयांचा वापर केल्याने पोट आणि पचनसंस्थेवर दबाव येतो. ज्यामुळे पोट लवकर स्वच्छ होते.
वेस्टर्न टॉयलेट वापरल्याने संसर्गाचा धोका वाढतो. यामुळे जुलाब आणि पोटाशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. वेस्टर्न सीट त्वचेच्या संपर्कात येते. यामुळे जंतू तुम्हाला आजारी पाडू शकतात.
भारतीय शौचालये गरोदरपणात महिलांसाठी चांगली असतात. कारण यामुळे नॉर्मल डिलिव्हरी होण्याची शक्यता वाढते. याशिवाय इंडियन टॉयलेट सीटचा वापर केल्यानं बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही.