मुंबई : आपल्या प्रेमाला मिळवण्यासाठी प्रेमी युगुल काहीही करायला तयार असतात. समोर कितीही मोठं संकट आलं तरी ते डगमडगत नाहीत. विशेष म्हणजे आलेली संकटं परतवून लावून आपला संसार थाटलेल्या अनेक जोड्या तुम्हाला पाहायला मिळतील. मात्र, एका माणासाने आपला संसार वेगळ्याच पद्धतीने थाटला आहे. विशेष म्हणजे लग्न करुन या माणासाने फक्त चार दिवसात आपल्या पत्नीला घटस्फोटही दिलाय. हा माणसू मूळचा इंडोनेशिया येथील असून त्याचं नाव खोइरुल अनाम (Khoirul Anam) असे आहे. या माणसाचे लग्न सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरतेय.
खोइरुल अनाम याने एखादी महिला किंवा तरुणीशी लग्न केलेलं नाही. तर त्याने चक्क एका प्रेशर कुकरसोबत घरोबा केलाय. विशेष म्हणजे लग्न करताना त्याने सगळी प्रक्रिया रितसर पार पाडली आहे. या आगळ्यावेगळ्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एका फोटोमध्ये तर अनाम कुकुरला चक्क किस करताना दिसतोय. पण कुकुरसबोत लग्न करुन तो एवढ्यावर थांबलेला नाही. त्याने आपल्या पत्नीला पुढच्या चारच दिवसात घटस्फोटदेखील दिला आहे. घटस्फोट देण्याचे कारण अगदीच चक्रावून सोडणारं आहे.
या तरुणाने कुकुरसोबत लग्न करुन त्याला नवरीचा साज चढवल्याचंदेखील एका फोटोमध्ये दिसतंय. तसेच दुसऱ्या एका फोटोमध्ये तो कागदपत्रांवर सही करताना दिसतोय. मात्र सध्या या तरुणाने कुकुरसोबत घटस्फोट घेतला आहे. याआधी त्याने त्याच्या लग्नचे फोटो शेअर केले होते. तसेच माझी बायको खूप चांगली आहे. ती जेवण उत्तम बनवते. काहीही बोलत नाही, असं त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं होत.
त्याने आपल्या पत्नीला म्हणजेच प्रेशर कुकुरला घटस्फोट देण्याचं कारणही तसंच विशेष आहे. माझ्या पत्नीला फक्त भात तयार करता येतो, त्यामुळे मी घटस्फोट घेतोय असं कारण या तरुणाने दिलेलं आहे. मुळात खोइरुल अनाम हा तरुण एक कंन्टेंट क्रिएटर आहे. त्याचे फेसबुकवरील अकाऊंट व्हेरिफाय केलेलं असून त्याचे लाखो चाहते आहेत. त्याच्या या लग्नाच्या पोस्टला आतापर्यंत दहा हजारपेक्षा जास्त लोकांनी शेअर केलं आहे. तर हजारो लोकांनी या फोटोंवर कमेंट्स केल्या आहेत.
इतर बातम्या :
सोशल मीडियावर पुन्हा #ghostphotochallenge ट्रेंड, नेटकऱ्यांकडून भूतांच्या पेहरावातले फोटो पोस्ट
(indonesia man married with electric pressure cooker photo went viral)