देशातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा सध्या सोशल मीडियावर खूप चांगल्या पोस्ट शेअर करत असतात. त्यामुळे त्यांच्या पोस्टवर नेटकरी तुफान गर्दी करतात. अनेक व्हिडीओ पोस्टला पाहिल्यानंतर लोक लाईक किंवा रिट्विट करायला विसरत नाहीत. ते नेहमीच आपल्या चाहत्यांसह प्रेरणादायी आणि आश्चर्यकारक पोस्ट शेअर करतात. आनंद महिंद्रा हे केवळ त्यांच्या व्यावसायिक मानसिकतेसाठीच नव्हे तर दररोज सोशल मीडियावर सक्रिय राहण्यासाठी देखील ओळखले जातात. (Industrialist Anand Mahidra posted a video of Halloween in India, Bhangra dance to Halloween by Indians)
आपल्या चाहत्यांचे नेहमीच मनोरंजन करण्यासाठी ओळखले जाणारे आनंद महिंद्रा यांनी आणखी एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल. व्हिडिओमध्ये हे पाहू शकता की, परदेशात साजरा होणारा हॅलोवीन डे सन जो भारतात 31 ऑक्टोबर 2021 रोजी अनेक भागांमध्येही साजरा करण्यात आला. काही भारतीय तरुणांनीही हॅलोविनच्या दिवशी स्वतःहून रस घेतला. मात्र, हॅलोविन डेच्या निमित्ताने भारतीयांनी अवलंबलेली पद्धत पाहून आनंद महिंद्रा थक्क झाले. आधी व्हिडीओ बघा, मग ठरवा
पाहा व्हिडीओ:
Halloween in India. Strong evidence that there is no cultural aspect/festival of any country that cannot be seamlessly (well, almost seamlessly!) assimilated by Indians. ? pic.twitter.com/FVHGvZcnVt
— anand mahindra (@anandmahindra) November 1, 2021
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये काही भारतीय तरुणांनी हॅलोविन डेच्या निमित्ताने भितीदायक आणि विचित्र कपडे घातले आहेत. हेच नाहीतर त्यांनी पंजाबी गाण्यांवर भांगडा करायला सुरुवात केली. पंजाबी गाण्यांवर भांगडा सादर करताना तरुणांनी असं काही केलं की जे परदेशातील लोक सहसा असे करत नाहीत. हा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करत आनंद महिंद्रा यांनी लिहिले की, ‘भारतात अशा प्रकारे हॅलोविन साजरा करण्यात आला. भारतातील लोक कोणत्याही देशातील सण सहजपणे आत्मसात करू शकतात याचा हा पुरावा आहे.
ट्विटरवर शेअर केलेला व्हिडिओ 1.5 मिलियनपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे. आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर 15 सेकंदांचा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात हॅलोविन डेच्या निमित्ताने अनेक तरुण-तरुणी जोरदार नाचत असल्याचे पाहायला मिळते. हा व्हिडिओ 1 लाख 66 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आणि सुमारे 6 हजार लोकांनी त्याला लाईक केले, तर 600 हून अधिक लोकांनी रिट्विट केले.
हेही पाहा: