महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीचे चेअरमन आनंद महिंद्रा सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतात. सोशल मीडियवर त्यांच्याकडून करण्यात येणाऱ्या पोस्टची चर्चा होत असते. त्या पोस्ट चांगल्याच व्हायरल देखील होतात. आता आनंद महिंद्रा यांनी एक व्हिडिओ एक्सवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये वैद्यकीय क्षेत्रामधील अनोखे तंत्रज्ञान दाखवले आहे. आपल्या शरिरातील नस शोधण्यासाठी ‘इन्फ्रारेड रे’चा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे वारंवार रक्त काढण्यासाठी नस शोधण्याच्या वेदनेपासून सुटका होणार आहे. व्हिडिओमध्ये रुग्णाच्या हातावर दबाव पडल्यानंतर नस कशा दिसतात, हे दाखवले आहे.
आनंद महिंद्रा यांनी म्हटले आहे की, रक्त काढताना वारंवार नस शोधण्याच्या वेदनेवर हा रामबाण उपाय आहे. हे सर्वात छोटा परंतु महत्वपूर्ण संशोधन आहे. यामुळे आपल्या जीवनातील गुणवत्तेमध्ये उल्लेखनीय बदल होऊ शकतो. आनंद महिंद्रा यांची ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली. अनेकांनी ती शेअर केली आहे. हजारो लोकांनी ती पहिली आहे. त्यावर अनेक कॉमेंट आल्या आहेत.
Using infrared light to locate veins.
Saving the pain from repeated attempts to find a vein when drawing blood.
It’s often the smallest, least glamorous inventions which significantly improve our medical experience and hence, the quality of our lives… pic.twitter.com/XgZI8Bcf2m
— anand mahindra (@anandmahindra) July 6, 2024
आनंद महिंद्रा यांनी केलेल्या या संशोधनाचे कौतूक करत ‘द GiTFD पीएम’ नावाच्या एका युजरने म्हटले आहे की, हे संशोधन मोलाचे आहे. रुग्ण आणि डॉक्टर दोघांसाठी हे महत्वाचे ठरणार आहे. यामुळे अनेक दुर्घटनाही टळू शकता. परिचारिकासंदर्भात नाराजी व्यक्त करत दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, नऊ ते दहा वेळा शोधून अनेक परिचारिकांना नस मिळत नाही. त्यामुळे हे संशोधन करण्यात आले आहे.
आणखी एका वापरकर्त्याने या नावीन्यपूर्ण संशोधनाची प्रशंसा केली आहे. त्याने म्हटले की, ‘ही खूप चांगली कल्पना आहे. अनेकांना नस शोधण्यासाठी अनेक वेळा इंजेक्शन टोचले जाते.