जेव्हा जेव्हा तुम्ही आधुनिक टॉयलेटमध्ये जाता तेव्हा एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेलच, ती म्हणजे दोन बटणांचा फ्लश. त्यातील एक लहान, तर दुसरे बटण मोठे असते. अनेकदा लोकांना हे समजत नाही. अशावेळी मग लोकं दोन्ही बटण दाबून निघून जातात. पण नेमकं फ्लश करण्यासाठी ही दोन बटणं का असतात? एका बटणाने पण काम होऊ शकतं ना? कधी हे जाणून घेण्याचा प्रयत्न तुम्ही कधी केला आहे का? आम्ही तुम्हाला याबद्दल सविस्तर सांगतो. कारण हे जर तुम्हाला माहित असेल तर आपण सगळे मिळून खूप पाणी वाचवू शकतो.
दोन बटण असतात. एक मोठं, एक छोटं. टॉयलेटमध्ये फक्त छोटं बटण वापरावं, कारण त्यामुळे तुमचं पाणी वाचेल.
1976 मध्ये अमेरिकन औद्योगिक डिझायनर विक्टर पैपनेक यांच्या मनात ही कल्पना प्रथम आली, जी आता जगभर पाहायला मिळते.
विक्टर पैपनेकने पाणी वाचवण्यासाठी दोन बटणांचे आधुनिक फ्लश शोधून काढले, जेणेकरून तुम्ही तुमच्या घरातील पाण्याची बचत करू शकाल.
आपले घर, शॉपिंग मॉल, सिनेमा हॉल अशा सर्वच ठिकाणी ड्युअल फ्लश टॉयलेट्स तुम्ही पाहिली असतीलच, पण त्यामागचे कारण काय आहे, हे कधी तुमच्या लक्षात आले आहे का?
वास्तविक विक्टर पैपनेक यांच्या या शोधापूर्वी शौचालयात पाण्याचा खूप जास्त व्हायचा. पण मग पाण्याचा वापर वाचविण्यासाठी त्यांनी दोन बटणांचे स्वच्छतागृह तयार केले.
मोठ्या बटणामुळे सुमारे 6 लिटर पाणी साठवले जाते, तर लहान बटण साडेतीन ते चार लिटरपेक्षाही कमी पाणी वापरते. म्हणजे छोटा फ्लश दाबला तर पाणी कमी बाहेर येईल, तर मोठ्या बटणामुळे पाणी जास्त वापरलं जाईल.
संपूर्ण जग पाण्याच्या समस्येशी झगडत आहे आणि अशा परिस्थितीत पाण्याची बचत ही प्रत्येक माणसाची नैतिक जबाबदारी आहे.
विक्टर पैपनेक यांनीही 46 वर्षांपूर्वी 1976 मध्ये ‘डिझाइन फॉर द रिअल वर्ल्ड’ या पुस्तकात याविषयी भाष्य केले होते.
मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, जर लोकांनी वर्षभर लहान फ्लशचा वापर केला तर ते 20 हजार लीटरपर्यंत पाणी वाचवलं जाऊ शकतं. आहेना इंटरेस्टिंग?