Ingrid Ohara Viral Video : ‘अरे हीला कुणी आवरा रे…’ अशी तुमची पहिली प्रतिक्रिया हा व्हिडिओ पाहिल्यानंतर असेल. या मॉडेलने रस्त्यावर आंघोळ केली, टॉवेल काढला, अहो लाली पण लावली. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये दिसणारी ही तरुणी कुणी साधीसुधी नसून एक प्रसिद्ध मॉडेल आहे. रस्त्यावर आंघोळ करताना ती दिसत असली तरी तिने जे काही केलंय, ते तुफान आहे, अशा प्रतिक्रिया नेटिझन्स देताना दिसताय.
रस्त्यावर आंघोळ करायला दम लागतो. तिने फक्त रस्त्यावर आंघोळच केली नाही. व्हिडिओमध्ये तुम्ही निट बघितलं तर तिने तिच्या अंगावरचा टॉवेल बाजूला केला अन् हे दृश्य पाहण्याऱ्याच्या ह्रदयाचा क्षणभरासाठी तरी ठोका चुकला असेल. म्हणजे काय लेव्हलला ही मॉडेल रस्त्यावर हे काम करत असेल, याचा अंदाज बांधू शकता. आता टिका करणारे, याला काहीही म्हणू देत. पण तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला कळेल ‘दम’ काय असतो.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. यात ही एक प्रसिद्ध मॉडेल रस्त्यावर आंघोळ करताना दिसत आहे. हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्यास तुमच्या लक्षात येईल की, भर रस्त्यात, गर्दीच्या ठिकाणी ही माहिला अंघोळ करत आहे. जाणारे-येणारे, पोलिस, तरुण, प्रौढ अशा सगळ्या लोकांमध्ये तेही अगदी मोठ्या गर्दीमध्ये ही मॉडेल धाडसाने केसांना शांपू लावते.
वर्दळीच्या ठिकाणी, रस्त्याच्या मधोमध तिचे केस धुवायला ती जेव्हा सुरूवात करते, त्यावेळी लोकांना नेमकं काय चाललं आहे, हे लक्षातच येत नाही. एवढंच काय तर, ती तिच्या केसांना शॅम्पू लावले आणि अंगावरही साबण लावते, हे सगळं ती भर रस्त्यावर करते, हे विसरायला नको. या मॉडेलचं नाव इनग्रिड ओहरा आहे.
व्हिडीओमध्ये दिसणारी ही महिला दुसरी, तिसरी कुणीही नसून इनग्रिड ओहरा ही आहे. ती 27 वर्षांची ब्राझिलची अॅक्ट्रेस आहे. ओहाराबद्दल अधिक बोलायचं झाल्यास ती सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि ओरिजिनल कंटेंट क्रिएटर आहे. या ब्राझिलच्या मॉडेलचं इंस्टाग्राम अकाऊंट @oharaingrid हे आहे. जिथे तिचे 11 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. इनग्रिड ओहारानं ‘अस गेमेस'(2019), ‘स्ट्रँडेड’ (2021) आणि ‘द सायलंट वन’ यांसारख्या फिल्म्समध्ये दिसून आली आहे.
इनग्रिड ओहराचा हा काही पहिला व्हायरल झालेला व्हिडिओ नाही. याआधीही तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्येही ती टॉवेल गुंडाळून रस्त्यावर आली होती. यावेळी देखील लोकांना काय प्रतिक्रिया द्यावी, हेच कळेना. अहो काहींना तर धक्काच बसला. इनग्रिड तिच्यासोबत ट्रॉली बॅग घेऊन जाताना दिसली होती.