आयुष्य किती काळ टिकेल याचा भरवसा नसतो, असे म्हणतात. त्यामुळे आयुष्य खुलेपणाने जगा आणि कोणतीही गोष्ट हलक्यात घेऊ नका. लोकांच्या आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात जेव्हा त्यांना कठीण काळातून जावे लागते. मात्र, हा कठीण काळही प्रबळ इच्छाशक्तीने हरवता येऊ शकतो. असाच एक योद्धा म्हणजे 26 वर्षीय आदित्य वशिष्ठ, जो आपल्या प्रबळ इच्छाशक्तीने एका दुर्धर आजारावरही मात करतो. एक काळ असा होता की त्याला अंथरुणावरून हलताही येत नव्हतं. आज तोच मुलगा फिटनेस ट्रेनर आहे. त्याची प्रेरणादायी कहाणी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रत्येकजण त्याला सलाम करत आहे.
आदित्यचा हा व्हिडिओ त्याच्या ‘पीपल ऑफ इंडिया’ नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये वयाच्या 26 व्या वर्षी त्याला एक दुर्मिळ आजार कसा झाला आणि मग त्याने त्यावर कशी मात केली हे स्पष्ट करण्यात आलंय.
आदित्यने वयाच्या 24 व्या वर्षी लग्न केले. नोव्हेंबर 2018 मध्ये तो आजारी पडला, त्याला तीव्र ताप आणि फ्लू झाला, पण त्यावेळी तपासणीत काही गंभीर आढळून आले नाही.
एक दिवस ब्रश करताना आदित्यच्या चेहऱ्याची उजवी बाजू वाकडी झाली, त्याला अर्धांगवायूचा झटका आला होता. त्याला बोटंही हलवता येत नव्हती.
हा प्रकार पाहून कुटुंबीयांनी तातडीने त्याला घेऊन रुग्णालयात धाव घेतली. जिथे डॉक्टरांनी सांगितलं की त्याला गिलेन-बॅरे सिंड्रोम आहे. हा एक दुर्मिळ आजार होता जो शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवर हल्ला करतो. यामुळे त्या व्यक्तीला अर्धांगवायू होतो.
जेव्हा डॉक्टरांनी आदित्यला सांगितले की, त्याची बरे होण्याची शक्यता खूप कमी आहे, तेव्हा तो रडला आणि त्याने आपल्या पत्नीला त्याला सोडून जाण्यास सांगितले. पण बायकोला ते पटलं नाही आणि ती आदित्यची सेवा करू लागली.
आदित्यच्या तब्येतीत किंचित सुधारणा झाली, पण नंतर त्याला हृदयविकाराचा किरकोळ झटका आला. यानंतर आदित्य पुन्हा पत्नीसमोर बोलू लागला.
अखेर आदित्यने आपल्या प्रबळ इच्छाशक्तीने या दुर्धर आजारावर मात केली. तो पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि आता फिटनेस ट्रेनर आहे. त्याचबरोबर कमाईही पूर्वीपेक्षा चांगली आहे.
त्याने ही कारही खरेदी केली आहे. आदित्यची गोष्ट ऐकल्यानंतर त्याच्या या उत्कटतेला सगळेच सलाम करत आहेत. एका युझरने लिहिले की, “वेळ कितीही कठीण असली तरी. धीर धरा आणि स्वत: ला आठवण करून द्या की ही वेळ देखील निघून जाईल.