Inspiring Story of women : आपण संघर्षाच्या कहाण्या वाचल्या, ऐकल्या आणि पाहिल्या असतील. आपल्या देशात असे अनेक लोक होऊन गेले आणि आताही अनेकजण आपण पाहतो, की त्यांची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची असतानाही त्यांनी त्यावर मात करत खूप मोठं यश मिळवलं. आज अशीच एक कहाणी आहे, जी एका मुंबईतल्या महिलेची आहे. संगणक (Computer) विकत घेण्यासाठी धडपडण्यापासून ते जगातील आघाडीच्या तंत्रज्ञान कंपनीत काम करण्यापर्यंत, या महिलेची कहाणी ही सर्वात प्रेरणादायी गोष्ट आहे जी तुम्ही वाचल्याशिवाय राहणार नाहीत. शाहिना अत्तरवाला, ज्या मायक्रोसॉफ्ट(Microsoft)मध्ये प्रॉडक्ट डिझाइन मॅनेजर (Product Design Manager) आहेत, त्या झोपडपट्टीत कशा वाढल्या आणि आता मुंबईत एका प्रशस्त अपार्टमेंटमध्ये कशा राहत आहेत, त्याचीच ही बातमी… मायक्रोसॉफ्टच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचं जुनं घर नेटफ्लिक्स मालिकेत पाहिलं आणि त्यांच्या एकूणच आयुष्याबद्दल बोलण्यासाठी मायक्रोब्लॉगिंग वेबसाइटवर नेलं.
In 2021 my family moved to an apartment where we can see the sky from home, good sunlight & ventilation. Surrounded by birds & Greenery. From my father being a hawker & sleeping on roads to having a life, we could barely dream of. Luck, Hardwork & picking battles that matter? pic.twitter.com/J2Ws2i4ffA
— Shaheena Attarwala شاہینہ (@RuthlessUx) January 26, 2022
‘दर्गा गल्लीत होतं घर’
“Netflix मालिका ‘Bad Boy Billionaires: India“मध्ये मुंबईतल्या झोपडपट्टीचं एका नजरेत दिसणारं दृश्य कॅमेऱ्यात कैद केलं. जे छायाचित्र पाहात आहात त्यातलं एक माझं घर आहे, असं त्यांनी ट्विटरवर लिहिलंय. अत्तरवाला यांनी सांगितलं, की त्या वांद्रे रेल्वे स्थानकाजवळच्या दर्गा गल्ली झोपडपट्टीत राहत होत्या. वडील तेलांचे फेरीवाले होते. ते उत्तर प्रदेशातून मुंबईत आले.
The @netflix series “Bad Boy Billionaires – India” Captures a birds-eye view of the slum in Bombay I grew up before moving out alone in 2015 to build my life.
One of the homes you see in the photos is ours. You also see better public toilets which were not like this before. pic.twitter.com/fODoTEolvS— Shaheena Attarwala شاہینہ (@RuthlessUx) January 26, 2022
‘झोपडपट्टीतलं जीवन कठीण’
“झोपडपट्टीतलं जीवन कठीण होतं आणि मला राहणीमान, लिंगभेद आणि लैंगिक छळाचा सामना करावा लागला. परंतु यामुळे माझ्यात शिकण्याची आणि माझ्यासाठी वेगळं काहीतरी करण्याची उत्सुकता वाढली, प्रेरणा मिळाली. वयाच्या 15व्या वर्षापर्यंत, मी पाहिलं होतं की माझ्या आजूबाजूच्या अनेक स्त्रिया असहाय्य, परावलंबी, अत्याचारित आणि स्वत:च्या आवडीनिवडी निवडण्याचं स्वातंत्र्य नसताना किंवा त्यांना जे व्हायचं ते बनवण्याचं स्वातंत्र्य नसलेल्या आयुष्यातून जात आहेत. मला हे नको होतं. काही तरी वेगळं करणारं असं नशीब माझी वाट पाहत होतं, असं त्या म्हणाल्या.
The @netflix series “Bad Boy Billionaires – India” Captures a birds-eye view of the slum in Bombay I grew up before moving out alone in 2015 to build my life.
One of the homes you see in the photos is ours. You also see better public toilets which were not like this before. pic.twitter.com/fODoTEolvS— Shaheena Attarwala شاہینہ (@RuthlessUx) January 26, 2022
‘संगणक बदलाचं माध्यम’
पहिल्यांदा संगणक पाहिला तेव्हा त्या आपोआपच त्याकडे वळल्या. त्या म्हणाल्या, “मला विश्वास होता की संगणक हे एक संधी देणारं साधन, माध्यम आहे. त्यासमोर बसला की संधी मिळतेच. स्थानिक कॉम्प्युटर क्लासेसमध्ये प्रवेश घेण्यासाठी वडिलांना पैसे उसने घेण्यास भाग पाडलं. दुपारचं जेवण सोडलं आणि स्वतःचा संगणक विकत घेण्यासाठी पैसे गोळा करण्यासाठी प्रयत्न केले. “मी प्रोग्रामिंग सोडलं आणि डिझाइनमध्ये करिअर करण्याचं ठरवलं. कारण डिझाइननं मला विश्वास दिला, की संधी अनेक आहेत. गोष्टी बदलू शकतात आणि तंत्रज्ञान हे बदलाचं साधन आहे,
‘नशीब, कठोर परिश्रम आणि केलेले प्रयत्न महत्त्वाचे’
अनेक वर्षे कठोर परिश्रम केल्यानंतर, त्या आणि त्यांचं कुटुंब एका अपार्टमेंटमध्ये गेलं. “माझे वडील फेरीवाले असण्यापासून आणि रस्त्यावर झोपण्यापासून ते जीवन जगण्यापर्यंतचं आपण स्वप्नही पाहू शकत नाही, अशा स्वरूपाचं एकूनच जीवन होतं. नशीब, कठोर परिश्रम आणि केलेले प्रयत्न महत्त्वाचे आहेत,” ट्विटरवर त्यांनी हे लिहिलंय.
वडिलांचे आभार
अत्तरवाला यांनीही त्यांच्या वडिलांचे त्यांच्या समर्पण आणि कठोर परिश्रमाबद्दल आभार मानले. त्या म्हणाल्या, “त्यांच्याकडे कोणतंही औपचारिक असं शिक्षण नाही, परंतु त्यांच्या कलांनी सर्व काही बदलून टाकलं. अनेक दशकं झोपडपट्टीत राहिल्यानंतर, त्यांच्या संयम आणि त्यागामुळे आम्हाला चांगलं जीवन जगण्यास मदत झाली. आम्ही बचत, आमच्या साधनापेक्षा कमी प्रतीचं जीवन जगणं आणि त्याग करण्यावर लक्ष केंद्रित केलं. ज्याचं फळ आज मिळतंय”