असा कसा हा ट्रॅक्टर? बस चलता ही जावे, चलता ही जावे…

| Updated on: Oct 15, 2022 | 3:47 PM

जुगाडू पराक्रम आपल्याला धक्का देतात. या भाऊंची 'बुलेट ट्रेन' बघा.

असा कसा हा ट्रॅक्टर? बस चलता ही जावे, चलता ही जावे...
Tractor Bullet Train
Image Credit source: Social Media
Follow us on

सोशल मीडियावर देसी जुगाडच्या व्हिडिओंची कमतरता नाही. होय, इंटरनेटवर एकापेक्षा एक व्यक्ती आहेत, ज्यांचे जुगाडू पराक्रम आपल्याला धक्का देतात. या भाऊंची ‘बुलेट ट्रेन’ बघा. असा जुगाड तुम्ही या आधी कधीच पाहिला नसेल. हा व्हिडीओ शेअर करताना त्या व्यक्तीने लिहिलं, “माझ्या वडिलांची रेल!”

हा व्हिडिओ 2 ऑक्टोबर रोजी इंस्टाग्राम पेजवर its_panther_official शेअर केला होता आणि लिहिले होते – माझ्या वडिलांची रेल.

या व्हिडीओने इंटरनेटवर धुमाकूळ घातलाय. प्रचंड लाईक्स, व्ह्यूज आणि शेअर या व्हिडिओला मिळालेत.

एका व्यक्तीने लिहिले की, “भाऊ बुलेट ट्रेन आली आहे”, आणखी एकाने लिहिले, “आपल्या देशाची खूप प्रगती झाली आहे”, तिसरी कमेंट आहे, “भारताची नवी ट्रेन”

या काही सेकंदांच्या व्हायरल क्लिपमध्ये रस्त्यावरून ट्रॅक्टर घेऊन जाणारा एक चाचा आपल्याला दिसतो. पण ट्रॅक्टरच्या मागे इतक्या गाड्या जोडल्या गेल्या आहेत की हे दृश्य पाहून कोणालाही ट्रेनची आठवण झाली.

ट्रॅक्टरच्या मागे सुमारे 20 गाड्या फिरताना दिसतील, ज्यामुळे ट्रेनचा फील या ट्रॅक्टरला येतोय. याच कारणामुळे बुलेट ट्रेन ते देसी इंडियन ट्रेन अशा कमेंट्स या ‘ट्रॅक्टर ट्रेन’वर येतायत.