स्वत:च्या मालकीचे घर प्रत्येकाला हवे असते, असे स्वप्न प्रत्येक भारतीयांचे असते. मग घर घेण्यासाठी जुन्या काळातील लोक आपल्या आयुष्यभरातील पुंजी खर्च करतात. त्यानंतर घर न घेऊ शकणारे कायम भाड्याच्या घरातच आपले आयुष्य काढतात. परंतु सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये घरभाडे न भरता दाम्पत्याने शोधलेला पर्याय दिसत आहे. हा पर्याय शोधणारे दाम्पत्य आहेत इंग्लंडमधील काई किन्सले आणि हेडी इलियट.
30 वर्षीय काई किन्सले आणि 25 वर्षीय त्यांची पत्नी हेडी इलियट यांनी गेल्या वर्षी त्यांच्या आयुष्यातील एक मोठा निर्णय घेतला. त्यांनी यापुढे भाड्याच्या घरात न राहण्याचे ठरवले. तसेच स्वत:चे घर न घेता घरभाडे वाचवण्याचा पर्यायावर ते विचार करु लागले. मग त्यांनी एका व्हॅनला आपले घर बनवण्यास सुरुवात केली. त्यांनी स्वत: 2014 मॉडेल प्यूजिओ गाडीमध्ये बदल करण्यास सुरुवात करुन त्याला घरासारखे केले. त्यासाठी त्यांना 4,39,700 रुपये खर्च आला. यापूर्वी ते वर्षाला 4,75,34,647 रुपये घरभाडे देत होते. ते इंग्लंडमधील वेस्ट ससेक्स भागात राहतात. त्या ठिकाणी घराभाडे खूप जास्त आहे. त्या तुलनेत व्हॅनच्या पार्किंगसाठी त्यांना महिन्याला केवळ 52 ते 53 हजार रुपये मोजावे लागतात.
किन्सले सुतार काम करतात. तर त्यांची पत्नी हेडी फोटोग्राफर आहे. त्यांनी मिळून त्यांच्या व्हॅनचे सर्व फिटिंग केले. यामुळे त्यांना मजुरीचा खर्चही लागला नाही. या दाम्पत्याचे म्हणणे आहे की, त्यांचे पैसे फ्लॅटमध्ये फक्त 10 तास झोपण्यासाठी कशासाठी गुंतवावे? त्या पेक्षा ते पैसे लक्झरी जीवन जगणे आणि प्रवासावर खर्च करणे अधिक चांगले आहे. विचार करण्याच्या या प्रवृत्तीमुळे आपले शारीरीक आणि मानसिक आरोग्य चांगले राहत असल्याचे काई किन्सले आणि हेडी इलियट म्हणतात.
इस्टांग्रामवर campervankai या अकाउंटवरुन या घराचे अनेक व्हिडिओ शेअर करण्यात आले आहे. ते व्हिडिओ चांगलेच व्हायरल झाले आहे. नेटकरी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहे. काही जणांनी त्यांचे कौतूक केले आहे. तर काही जणांनी स्वत: घर ते स्वत:चे घरच असते, अशी प्रतिक्रिया दिली आहे.