best invention
Image Credit source: Social Media
मानवी जीवन सुकर करण्यासाठी तंत्रज्ञानाने खूप साथ दिली. बदलत्या काळानुसार तंत्रज्ञानाचा विकास आजही झपाट्याने होत आहे. प्रगत तंत्रज्ञानामुळे आपला बराच वेळ वाचतो. आज आपण काही मिनिटांतच तासांतासाचं काम करतो. एक काळ असा होता की रेल्वेचं तिकीट काढण्यासाठी लोकांना तासंतास रांगेत उभं राहावं लागायचं, पण आज आपण आपल्या फोनच्या एका क्लिकवर तिकीट बुक करू शकतो. जगातील कुठल्याही कानाकोपऱ्यातली बातमी जाणून घेण्यासाठी लोक मोबाईल फोन आणि टेलिव्हिजनचा वापर करतात. हे कळण्यासाठी आता वर्तमानपत्रांची वाट पाहावी लागत नाही. गेल्या 20 वर्षांत मानवाचे जीवन सुसह्य करणाऱ्या काही शोधांविषयी आपण इथे बोलणार आहोत. असे कोणते शोध गेल्या 20 वर्षात लागले ज्यामुळे माणसाच्या मोठे बदल झाले आणि माणूस स्मार्ट झाला? चला जाणून घेऊयात…
- गुगल! गुगल तुमच्या बहुतांश प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करते. कोणत्याही प्रकारच्या संभ्रमात असल्यावर लोक गुगलचा वापर करतात. सध्या बहुतांश लोक गुगलशी परिचित असतील. गुगलचा शोध 1998 साली लागला होता.
- फेसबुक! तुमच्यापैकी खूप जण फेसबुक या सोशल मीडिया ॲपशी परिचित असतील. फेसबुकचा शोध 2004 साली लागला. आज घडीला ३ अब्जाहून अधिक लोक फेसबुक वापरतात. संवाद साधण्यासाठी, बातम्यांचा प्रसार करण्यासाठी आणि व्हिडीओ शेअरिंग साठी याचा वापर केला जातो.
- एक काळ असा होता की, लोक मनोरंजनासाठी दूरचित्रवाणीचा वापर करत असत आणि त्यावर येणाऱ्या काही कार्यक्रमांवर अवलंबून असत. 2005 साली यू ट्यूब आल्यानंतर मनोरंजन विश्वात मोठी क्रांती झाली.यू-ट्यूब आल्यानंतर लोक आपल्या आवडीचा कंटेंट ॲक्सेस करत आहेत. इतकंच काय तर युट्युबवर व्हिडीओ शेअर करून अनेक जण भरपूर कमाई करत आहेत.