श्रीहरीकोटा : भारतीय अंतराळ संशोधन केंद्र अर्थात इस्त्रोकडून एक महत्त्वाची माहिती जारी करण्यात आली आहे. इस्त्रोचे शास्त्रज्ञ गेल्या काही दिवसांपासून चांद्रयान-3 मोहिमेसाठी दिवसरात्र काम करत आहेत. ही मोहिम इस्त्रो आणि भारत सरकारसाठी अतिशय महत्त्वकांक्षी अशी मोहीम आहे. ही मोहिम यशस्वी झाली तर शास्त्रज्ञांना चंद्र ग्रहावरील अनेक गोष्टींची माहिती मिळणार आहे. ही मोहीम यशस्वी ठरली तर चंद्राविषयीचे अनेक गूढ उलगडण्यास मदत होणार आहे. इस्त्रोच्या चांद्रयान-2 चं चंद्रावर लँडिंग झाल्यानंतर अंतिम क्षणाला संपर्क तुटला होता. त्यामुळे खगोल शास्त्रज्ञांसह संपूर्ण देशाच्या नागरिकांचा मोठा हिरमोड झाला होता. या नव्या चांद्रयान-3 मोहिमेवर सरकारसह शास्त्रज्ञांना खूप आशा आहे.
इस्त्रोच्या वैज्ञानिकांकडून या मोहिमेसाठी खूप मेहनत आणि प्रयत्नदेखील करण्यात येत आहेत. भारतीय या नव्या चांद्रयानाचं प्रक्षेपण पाहण्यासाठी आतूर झाले आहेत. तसेच हे चांद्रयान जेव्हा चंद्रावर लँड होईल, तेव्हाचा रोमांचक क्षण भारतीयांना आपल्या डोळ्यांत साठवायचा आहे. विशेष म्हणजे इस्त्रोकडून भारतीयांसाठी एक गूड न्यूज देण्यात आली आहे.
इस्त्रोचं महत्त्वकांक्षी असणारं चांद्रयान-3 हे 14 जुलैला लॉन्च होणार असल्याची माहिती जाहीर करण्यात आली आहे. आंध्र प्रदेशच्या श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरुन या यानचं लॉन्चिंग केलं जाणार आहे. 14 जुलैला दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी चंद्रयान-3 चं प्रक्षेपण होणार आहे, अशी माहिती इस्त्रोने ट्विटरवर दिली आहे.
इस्त्रोकडून नुकतंच याबाबतचा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. चांद्रयान-3 हे रॉकेटच्या वरच्या भागात ठेवण्यात आलं आहे. यानंतर ते असेम्लिंग युनीटमध्ये नेण्यात आलं आहे. जीएसएलवी एमके-3 या रॉकेटशी ते संलग्न करण्यात आलं आहे, अशी माहिती समोर आली आहे.
इस्त्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी या विषयी माहिती दिली आहे. चांद्रयान-3 हे यान 23 आणि 24 ऑगस्टला चंद्राच्या पृष्ठभागावर किंवा परिघात लँडिंग करण्याचा प्रयत्न करेल, अशी महिती एस सोमनाथ यांनी दिली आहे.
चंद्रयान-3 या मोहिमेचा बजेट तब्बल 651 कोटी रुपये इतका आहे. चांद्रयान-3 चं लँडर चंद्रावर लँडिंग होण्यास यशस्वी झालं तर अशी मोहिम करणारा भारत हा जगातील चौथा देश असणार आहे. याआधी अमेरिका, रशिया, चीन या देशांनी चंद्रावर आपले स्पेसक्राफ्ट उतारले आहेत.
#WATCH | Bengaluru, Karnataka: S Somnath, Chairman, ISRO during G20 Space economy leaders meeting on launch of Chandrayaan-3 says, “…On July 14 at 2.35 pm, Chandrayaan-3 will lift off & If everything goes well it will land on August 23…the date is decided based on when is the… pic.twitter.com/AmPLpDoppc
— ANI (@ANI) July 6, 2023
या मोहिमेअंतर्गत चंद्राच्या पृष्ठभागावर एक लँडर उतरवण्यात येणार. या लँडरला एक रोवर आहे. ही रोवर चंद्राच्या जमिनीवर फिरेल आणि तिथे काही प्रयोग करणार. हे लँडर चंद्रावर एक लूनार दिवसपर्यंत राहील. एक लूनार दिवस म्हणजे पृथ्वीवरचे 14 दिवस.
चांद्रयान-3 च्या लँडरसाठी चंद्रावर सूर्यप्रकाश असणं जरुरीचा आहे. चंद्रावर 14-15 दिवस सूर्य उगवतो. तर पुढचे 14-15 दिवस सूर्य उगवत नाही.