बापरे आयुष्यात कधी काय होईल काहीच सांगता येत नाही. अक्षरशः चालता चालता सुद्धा कुणासोबत काहीही होऊ शकतं. हायवे वरचे व्हिडीओ तर प्रचंड व्हायरल होतात. कधी अपघात होतो, कधी बिबट्याच काय आडवा जातो, कधी हरीण हायवे वरून काय पळतं, तर कधी काय. एकसे बढकर एक व्हिडीओज असतात. असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय. हा व्हिडीओ खरं तर जुना आहे पण तो पुन्हा व्हायरल झालाय. या व्हिडिओत एक माणूस हायवेने सायकलवरून जातोय. अचानक पुढे काहीतरी असं होतं की आपल्याच हृदयाचा ठोका चुकतो. नशीब बलवत्तर पाहिजे बाकी काही नाही असंच वाटतं हा व्हिडीओ बघून…
हा व्हिडीओ आहे देहरादून-हृषीकेश हायवेचा! हायवे नेहमीप्रमाणे वाहताना दिसतोय. एक माणूस सायकलवरून जाताना दिसतोय. त्यालाही कल्पना नसेल आपल्यासोबत पुढे काय होणारे.
पिवळ्या रंगाचा टी शर्ट घातलेला हा माणूस निवांत आपल्या नेहमीच्या रस्त्याने चाललाय. थोडंसं पुढे गेल्यावर “आपल्यावर कुठल्यातरी प्राण्याने हल्ला केलाय” फक्त इतकीच जाणीव होईल इतक्या पटकन एक प्राणी येऊन त्याच्यावर हल्ला करतो.
On Dehradun-Rishikesh Highway….
Both are lucky ☺️☺️ pic.twitter.com/NNyE4ssP19— Susanta Nanda IFS (@susantananda3) September 21, 2022
व्हिडीओ पाहणाऱ्याला जितक्या लवकर लक्षात येतं हा एक बिबट्या आहे. तितक्या लवकर ज्याच्यावर हल्ला झालाय त्यालाही कळलं नसेल. इतकं फास्ट हे सगळं घडतं.
आपल्याच नादात सायकल चालवणारा हा माणूस. थोडा पुढे गेला की बिबट्याच्या हल्ल्याचा शिकार होतो. बिबट्या असा पटकन जंगलात येऊन सायकलला धडक देतो आणि तितक्याच पटकन आत जंगलात जातो. या दरम्यान तो त्या माणसाला चावायचा सुद्धा प्रयत्न करतो.
बिबट्या जंगलात निघून गेल्यावर घाबरलेला माणूस सायकल घेऊन यू- टर्न मारतो. जोरात पळत सायकल घेऊन परत येतो, पुढे जातच नाही.
ही क्लिप आयएफएस अधिकारी सुसंता नंदा यांनी ट्विटरवर शेअर केलीये. हा व्हिडिओ ६७ हजारांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेलाय. यावर बऱ्याच प्रतिक्रिया मिळाल्या आहेत.
बिबट्याने केलेला अनपेक्षित हल्ला पाहून लोक हैराण झाले. आसाममध्ये या घटनेने अनेकांचं लक्ष वेधलंय.