नवी दिल्ली | 14 फेब्रुवारी 2024 : साधारणपणे सर्वात स्वस्त हॉटेलचा रुम फक्त 700-800 रुपयात मिळतो. हे सर्वांना माहीत आहे. पण एक असंही हॉटेल आहे. त्या हॉटेलच्या रूमची किंमत फक्त एक डॉलर म्हणजे 83 रूपये आहे. अवघ्या 83 रूपयात या हॉटेलचा रूम मिळतो. तो खिशाला परवडणाराही आहे. पण एक अट आहे. ती अट तुम्ही ऐकली तर थक्क व्हाल. तुमचंही डोकं गरगरल्या शिवाय राहणार नाही. अशी काय आहे अट? त्या अटीमुळेच एवढ्या कमी किमतीत रूम मिळतोय का? चला तर जाणून घेऊया.
ही हॉटेल जपानच्या फुकोका येथे आहे. तुम्ही या हॉटेलात 100 येन देऊन राहू शकता. 100 येनची किमत ही एक डॉलर एवढी आहे. रुपयात मोजायचं झालं तर 83 रुपये. तुम्ही विचारात पडला असाल की एवढ्या स्वस्तात हॉटेलचा रुम कसा काय मिळतोय? हॉटेल मालकाला कसा फायदा होत असेल? एवढ्या कमी किमतीत रूम दिल्यानंतर हॉटेलचा खर्च कसा निघत असेल? असे असंख्य प्रश्न निर्माण झाले आहेत.
हे प्रश्न मनात निर्माण होणं चांगलंही आहे. मात्र, एवढा स्वस्त रूम कोणत्याही अटीशिवाय मिळणार नाही हे ही तितकंच खरं आहे. या हॉटेल मालकानेही तेच केलंय. त्याने हा रुम स्वस्तात दिलाय. पण देताना एक अट घातली. ही अट घातल्यानेच हॉटेलची कमाई वाढली आहे.
हॉटेल मालकाची अट अत्यंत अतरंगी आहे. ग्राहकाला जितके दिवस स्वस्तात राहायचं त्यांनी तितके दिवस खुशाल राहावं. पण इथे राहत असताना त्याने चेक इन करण्यापासून चेक आऊट करण्यापर्यंतचं वास्तव्य लाइव्ह करायचं आहे. म्हणजे ग्राहकाला त्याचा संपूर्ण स्टे लाइव्ह स्ट्रीम करायचा आहे. ज्याला हे मंजूर असेल त्यालाच 83 रुपयात हॉटेलचा रूम दिला जात आहे. ही अट अनेकांना धक्का देणारी आहे. पण अनेक लोक हसत हसत ही अट मान्य करतानाही दिसत आहे.
हॉटेलने ग्राहकांना त्यांचं संपूर्ण स्टे लाइव्ह करायला सांगितलं आहे. म्हणजे प्रत्येक रुममध्ये असंख्य कॅमेरे लागले आहेत. त्यामुळे आत रुममध्ये काय चाललंय हे बाहेरच्या लोकांना स्पष्टपणे पाहता येत आहे. जे लोक या हॉटेलची लाइव्ह स्ट्रीम पाहत आहे, त्यांच्याकडून हॉटेल पैसे घेते. यातून हॉटेलची किती कमाई होते हे स्पष्ट झालेलं नाही. पण असाही रयोकन नावाचं हे हॉटेल अनेक वर्षांपासून याच सिद्धांतावर काम करत आहे. फुकोकामध्ये हॉटेल रुम महागात मिळतात असंही नाही. एखाद्या हॉटेलातील साधा रुमही दोन ते तीन हजारात सहज मिळतो. पण हे हॉटेल अल्ट्रा चीप आहे. तसेच लाइव्ह स्ट्रीम हे त्यांनी कमाईचं बिझनेस मॉडेल बनवलं आहे.
हॉटेलात राहायला आलेल्या व्यक्तीला केवळ लाइव्ह स्ट्रिमिंगची परवानगी द्यावी लागते. बाथरूम वेगळा आहे, त्यामुळे तिथपर्यंत कॅमेरा पोहोचतच नाही. त्याशिवाय तुम्हाला लाइट्स बंद करण्याचीही परवानगी असते. ही लाइव्ह स्ट्रिमिंग केवळ व्हिडीओची असते. ऑडिओ नसतो. म्हणजेच तुम्ही रुममध्ये काही संवाद साधत असाल तर तो लोकांना ऐकायला येणार नाही. मात्र, तुम्ही रुममध्ये काय करत आहात हे सर्व लोकांना पाहता येतं. जपानचं फुकोका शहर अत्यंत सुंदर आहे. उद्याने, मंदिर, संग्रहालये आणि तीर्थस्थळांसाठी हे शहर प्रसिद्ध आहे.