ऐकावं ते नवलच, TV अँकरचं पुरुषांबद्दलचं ‘ते’ एक वाक्य अन् थेट गमवावी लागली नोकरी, नेमकं काय म्हणाली?

| Updated on: Aug 27, 2024 | 4:53 PM

पुरुषांबद्दल एक वक्तव्य करणं एका टीव्ही अँकरला चांगलंच भारी पडलं आहे. या अँकरने पुरुषांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर तिच्यावर प्रचंड टीका करण्यात आली. तसेच तिला या कृत्याची मोठी शिक्षा भोगावी लागली.

ऐकावं ते नवलच, TV अँकरचं पुरुषांबद्दलचं ते एक वाक्य अन् थेट गमवावी लागली नोकरी, नेमकं काय म्हणाली?
TV अँकरचं पुरुषांबद्दलचं 'ते' एक वाक्य अन् थेट गमवावी लागली नोकरी
Follow us on

जपानमधून एक विचित्र प्रकरण समोर येत आहे. इथे एका महिला टीव्ही अँकरला तिने सोशल मीडियावर पुरुषांच्या शरीरातून येणाऱ्या दुर्गंधी विषयी पोस्ट केल्याने तिला नोकरीतून काढून टाकण्यात आलं आहे. या महिला पत्रकाराचं नाव यूरी कावागुची असं आहे. तिच्यावर सोशल मीडियावर चौफेर टीका करण्यात आलीय. यूरी टोक्यो येथील एका टीव्ही चॅनलची अँकर होती. यूरीने पुरुषांच्या घामामुळे येणाऱ्या दुर्गंधी विषयी नाराजी व्यक्त केली होती. यूरीने 8 ऑगस्टला सोशल मीडियावर पोस्ट टाकली होती. गरमीच्या दिवसांमध्ये काही पुरुषांच्या शरीरातून प्रचंड दुर्गंधी येते, असं यूरी आपल्या पोस्टमध्ये म्हणाली. याशिवाय यूरीने पुरुषांना दिवसभरात एका पेक्षा जास्त वेळा अंघोळ करण्याचा सल्ला दिला होता. मी स्वत:ला ताजतवानं वाटावं यासाठी वाईप्स आणि फ्रेगनेंसचा वापरते. अनेक पुरुषांनादेखील तेच केलं पाहिजे, असं यूरीने म्हटलं होतं.

नेटीझन्सकडून टीकेची झोड

यूरीच्या पोस्टनंतर तिच्यावर नेटीझन्सनी प्रचंड टीका केली. यूरीवर लिंगाच्या आधारावर भेदभाव करण्याचा आणि कारण नसताना पुरुषांना टार्गेट केल्याचा आरोप करण्यात आला. यूरीला ट्रोल करणाऱ्यांना म्हटलं की, ही समस्या केवळ पुरुषांपुरता मर्यादित नाही. त्यामुळे या गोष्टीला कोणत्याही एका लिंगासोबत जोडणं योग्य नसल्याचं म्हटलं.

यूरीला कामावरुन काढलं

एका युजरने कमेंट करत म्हटलं की, “केवळ पुरुषांना दोष देणं चुकीचं आहे. ज्येष्ठ महिलांच्या शरीरातून गंध येऊ शकतो.” आपल्या एका पोस्टवरुन टीकेची झोड उठल्यानंतर यूरीने ती पोस्ट डिलीट केली. पण लोकांनी यूरीकडे जाहीरपणे माफी मागण्याची मागणी केली. दुसरीकडे यूरीच्या या पोस्टमुळे तिला ती काम करत असलेल्या मीडिया कंपनीने कामावरुन काढून टाकलं.

यूरीने मागितली जाहीर माफी

इतक्या सर्व घडामोडींनंतर यूरीला आपल्या केलेल्या पोस्टचा पश्चात्ताप झाला. तिने ट्विट करत जाहीरपणे माफी मागितली. मला या गोष्टीची जाणीव झालीय की, मी केलेल्या टिप्पणीमुळे अनेकांच्या भावना दुखावल्या. मी प्रयत्न करेन की, यापुढे माझ्याकडून अशी टिप्पणी केली जाणार नाही, ज्यामुळे कुणाचं मन दुखावेल. मला खरंच या घटनेची खंत वाटत आहे, असं यूरीने म्हटलं.