एक जेसीबी एक जीर्ण पूल पाडत असताना एक अतिशय भीतीदायक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झालाय. विशेष म्हणजे हा व्हिडीओ अनेक राजकीय नेत्यांनी सुद्धा शेअर केलाय. हा व्हिडिओ अनेक युझर्सनी शेअर केला आहे, ज्यामध्ये ही संपूर्ण भीषण घटना कैद झाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ही घटना गुजरातमधील बनासकांठा येथील आहे. एकप्रकारे निष्काळजीपणाच असे त्याचे वर्णन केले जात आहे.
झाले असे की, एक पूल तोडण्यासाठी जेसीबी बोलावला, तो जेसीबी त्या पुलावर चढला आणि तो तोडण्यासाठी पोहोचला. पुलाच्या वर जेसीबी दिसतोय बघा…
આને કહેવાય પગ પર કુહાડો મારવો, વીડિયો જોઈને તમને જેસીબી ચાલકની અકક્લ પર જરૂર વિચાર આવશે….#GSTV #gujaratsamachar #Banaskantha #viralvideo #JCB #bridge pic.twitter.com/shcZesU4rI
— GSTV (@GSTV_NEWS) December 16, 2022
काळात पूल पाडताना अचानकच पुलाचा भाग पडला, त्यावर जेसीबी उभा असतो. यानंतर पूल पाडता पाडता जेसीबीच तिथे कोसळला आणि मोठा स्फोट झाला.
लगेच सर्व कर्मचारी त्या बाजूच्या दिशेने धावू लागले. जेसीबीचा चालक किरकोळ जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या त्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.