पठ्ठ्याने जुगाड करून ड्रम पासून बनवला कुलर!

| Updated on: Jun 04, 2023 | 5:39 PM

एका व्यक्तीने रिकाम्या ड्रमचे कुलरमध्ये अशा प्रकारे रूपांतर केले की त्या समोर एसीही फिका पडेल. जुगाडचा हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून लोक त्यावर कमेंट करत आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

पठ्ठ्याने जुगाड करून ड्रम पासून बनवला कुलर!
Cooler at home
Follow us on

मुंबई: बऱ्याच लोकांसाठी, कचरा फक्त कचरा आहे, परंतु जुगाडू माणूस त्यात जीव टाकतो आणि त्याला कामाची गोष्ट बनवतो. हे पाहिल्यानंतर चांगले अभियंतेही स्तब्ध होतील. आता पाहा हा व्हिडिओ. जिथे एका व्यक्तीने रिकाम्या ड्रमचे कुलरमध्ये अशा प्रकारे रूपांतर केले की त्या समोर एसीही फिका पडेल. जुगाडचा हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून लोक त्यावर कमेंट करत आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर एका अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. एका युजरने लिहिलं- ‘ज्या व्यक्तीने हे बांधलं तो नक्कीच आयआयटी इलेक्ट्रिक इंजिनिअर असेल.” आणखी एकाने लिहिले की, “अशा प्रकारचे कूलर फक्त भारतातच पहायला मिळतात.”

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, या व्यक्तीने आपली खोली थंड करण्यासाठी जुगाड करून कूलर बनवला आहे. ते बनवण्यासाठी त्याने प्लॅस्टिकचा ड्रम अगदी कूलरसारखा कापला, जेणेकरून त्यात मोटर आणि पंखा बसवता येईल. या सर्व प्रकारानंतर त्यात गवतासाठी जाळी बसविण्यात आली आहे. जेणेकरून थंड हवा घराच्या आत येऊ शकेल. ते बनवल्यानंतर ते चालवूनही दाखवण्यात आले आहे, जे चांगले काम करत आहे.