सोशल मीडियावर जुगाडाचे व्हिडीओ खूप व्हायरल होत असतात, ज्यांना यूजर्सना खूप पसंती देतात. हे व्हिडीओ पाहून आपण जिथे अनेक वेळा आश्चर्यचकित होतो, त्याचवेळी हे जुगाड पाहून आपण थक्क होतो. अलीकडच्या काळात असाच एक व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ते पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल की, याला म्हणतात खऱा जुगाडी इंजिनिअर. (Jugaad Video of Man use nut bolt to repair broken slippers video goes viral on social media indian jugaad )
जगातील काही लोक असे असतात ज्यांना तुम्ही कोणतेही कठीण काम देता, पण ते करण्यासाठी ते जुगाडाचा वापर करतात. त्यांची कलाकृती पाहून भले भले अभियंतेही क्षणभर थक्क होतात, आजकाल असाच काहीसा प्रकार समोर आला आहे, ज्यात एकाने तुटलेली चप्पल दुरुस्त करण्यासाठी असा जुगाड अवलंबला आहे, ज्याला पाहून तुम्हीही म्हणाल, ‘भावा आता पाय तुटतील, पण चप्पल तुटणार नाही.”
तुटलेली चप्पल दुरुस्त करण्याचा मजेदार जुगाड
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, एक माणूस त्याच्या तुटलेल्या चप्पलमध्ये नटबोल्ट फिक्स करत आहे. चपलेचा अंगठा आणि बोटांमध्ये तळाला जोडण्यासाठी तो मोठे नट-बोल्ट बसवतो. जेणेकरून त्याची चप्पल कधीही तुटू नये…! हा व्हिडीओ पाहिल्यानंतर एक गोष्ट नक्की आहे की तुमच्या डोळ्यांचं पारणं फिटेल.
हा व्हिडिओ पाहा
सोशल मीडियावर या जुगाडचा हा व्हिडिओ पाहून आश्चर्य वाटेल. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ‘हे नट-बोल्ट्स फक्त जड वस्तू जोडण्यासाठी वापरले जात असले तरी एक गोष्ट निश्चित आहे की, चप्पलमध्ये बसवल्यानंतर आता चप्पल कधीही तुटणार नाहीत. ‘ तर दुसऱ्या युजरने लिहिले, ‘भाऊ! हा जुगाडाचा मास्टर आहे.’ दुसर्या यूजरने लिहिले, ‘हा जुगाड पाहिल्यानंतर मी फेविक्विकलाही विसरलो आहे.’ याशिवाय इतर अनेक यूजर्सनी या व्हिडिओवर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.
हा व्हिडिओ @tahreemanam नावाच्या इंस्टाग्राम यूजरने शेअर केला आहे. ज्याला बातमी लिहिपर्यंत शेकडो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत.
हेही पाहा