कुत्र्याला कधी अभिनय करताना पाहिलंय का? तुमचा विश्वास बसत नसेल ना? प्राणी सुद्धा माणसांप्रमाणेच अभिनय करू शकतात. तेही आपल्यासारखेच प्रेमळ असतात, आपल्यासारखेच तेही चिडतात, तेही रुसतात आणि आपल्यासारखीच त्यांनाही भूक लागते. लहान मुलं कशी काही हवं असलं की हट्ट करतात किंवा नाटक करतात तसंच काहीसं या कुत्र्याने केलाय. हा व्हिडीओ खूप व्हायरल झालाय. यात कुत्र्याने त्याला खायला मिळावं म्हणून जे काय नाटक केलंय ते खूपच हटके आहे.
लोकांचा सगळ्यात आवडता प्राणी कुठला असेल तर तो कुत्रा आहे. प्रत्येकाला कुत्रा पाळायचा असतो. त्याची तशी कारणं सुद्धा आहेत. कुत्रा गोंडस, आपल्या मालकाशी एकनिष्ठ असतो.
हा व्हिडीओ बघा तुम्हाला कुत्रा एक चांगला अभिनेता असू शकतो हेही पटेल. एका कुत्र्याने असा अभिनय केला, ज्यामुळे चांगले चांगले कलाकार सुद्धा थक्क होतील, व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहा.
Trust issues with animals ? pic.twitter.com/Vl3tbAJBs1
— Tansu YEĞEN (@TansuYegen) September 23, 2022
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक कुत्रा लंगडत चालतोय. कुत्र्याची अशी अवस्था पाहून त्याच्या पायाला दुखापत झाली आहे, असं वाटतं. सगळ्यांना दया सुद्धा येते हे बघून.
तो लंगडत लंगडत आपल्या कॅमेरामनपर्यंत पोहोचतो. हे पाहून कॅमेरामन त्याला जेवण देतो आणि त्यानंतर तो आपल्या पायावर व्यवस्थित चालू लागतो.
अचानक त्या कुत्र्याचं लंगडनं बंद होतं. व्हिडिओच्या शेवटी कळतं, अरे हा तर नीट आहे, हे सगळं नाटक फक्त खाण्यासाठी चालू होतं.