हे घर अद्भुत आहे. जेव्हा तुम्ही या घरात आतमध्ये जाल, तेव्हा तुम्हाला समजेल की घराचा मालक कनुभाईने काय चमत्कार केलाय. हे घर सामान्य घरांसारखंच आहे, पण मालकाने यात अशा अशा गोष्टी बसवल्यात की या घराला काहीच खर्च नाही. कनुभाई करकरे यांचं हे गुजरात मधलं घर. हे घर अमरेली मध्ये आहे. कनुभाई कधीही वीज आणि पाण्याची बिले भरत नाहीत. त्याला कारणंही तितकंच छान आहे. या घराचं डिझाईनच असं आहे. ज्यामुळे इथे खर्च नाही उलट नफा आहे.
राज्य सरकारच्या शिक्षण विभागातील अधिकारी कनुभाई यांनी 2000 साली 2.8 लाख रुपयांत या घराची रचना व बांधकाम केले. मात्र, घरातील कामांसाठी आंधळेपणाने वास्तुविशारदावर अवलंबून न राहता सर्वांसाठी आदर्श घालून देणारे घर त्यांनी तयार केले.
शहरात राहणाऱ्या लोकांसाठी कायमस्वरूपी आणि उत्पन्नाची घरे तयार करण्यात आली. कनुभाईंचे घर असे आहे की जिथे इतर कोणत्याही स्त्रोताच्या मदतीशिवाय तीन वर्षे पाण्याची गरज भागविली जाऊ शकते.
याव्यतिरिक्त, कनुभाईंचे कुटुंब सेंद्रिय भाज्या पिकवते आणि आवारातच त्यांच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करते. शिवाय या घराला ग्रिडला वीज पुरवठा करून शासनाकडून 10 हजार रुपयेही मिळतात.
राज्यातील सौराष्ट्र भागात पाणीटंचाईची कायम समस्या असते, यावर कायमस्वरूपी सुविधा सुरू करण्यासाठी त्यांनी ही कल्पना केली असं कनुभाई स्पष्ट करतात.
“या भागात दर उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागतो आणि महिन्यातून 15 दिवस पाणी मिळते. त्यामुळे अत्यंत गैरसोय होते आणि म्हणूनच मी हे संकट सोडवण्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला.” असं ते सांगतात.
त्यांनी खिडक्या मोठ्या केल्या आणि हॉरीझॉन्टल क्रॉस-व्हेंटिलेशन तंत्रज्ञानाने घरात हवा फिरत असल्याची खात्री केली. या तंत्राने घरात थंड हवा चांगली येते ज्यामुळे साहजिकच लाईट आणि पंख्याचा वापर कमी होतो.
पाणीटंचाईच्या समस्येवर उपाय म्हणून कनुभाईंनी पावसाळ्यात पावसाचे पाणी साठवणारी 20 हजार लिटर क्षमतेची भूमिगत पाण्याची टाकी बांधली. घराच्या अंगणात 8,000 लिटर क्षमतेची आणखी एक पाण्याची टाकी बागायती आणि इतर बिगर-घरगुती गरजा भागवते.
पावसाचे पाणी वापरण्याची कल्पना खूप विलक्षण आहे आणि लोकांनी त्याचा वापर केला पाहिजे. “जर जास्त पावसामुळे दोन्ही टाक्या ओव्हरफ्लो झाल्या, तर रेन वॉटर हार्वेस्टिंग केले जाते आणि भूजल पातळीचे पुनर्भरण होते. अशा प्रकारे, आमच्या घराच्या आवारात मिळणारे पावसाचे पाणी घरगुती कारणासाठी वापरले जाते किंवा निसर्गाला परत दिले जाते.” पाण्याच्या वापराबद्दल ते मोठ्या अभिमानाने सांगतात.