कर्नाटकातील बागलकोट येथील एका रुग्णालयात झालेल्या शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांच्या टीमने एका रुग्णाच्या पोटातील 187 नाणी काढली. बागलकोट जिल्ह्यातील श्री कुमारेश्वर रुग्णालयात ही शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्टरांच्या टीमबरोबरच आता सर्वसामान्यांसाठीही हा कुतूहलाचा विषय बनला आहे. रुग्णालयाने रविवारी शस्त्रक्रिया पूर्ण करण्यापूर्वी दयामाप्पा हरिजन नावाच्या ५८ वर्षीय रुग्णाला पोट फुगणे, पोटदुखी आणि सतत उलट्या होत असल्याच्या तक्रारींमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी सर्वसाधारण तपासणी केल्यानंतर पेशंटचा एक्स-रे आणि एन्डोस्कोपी करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
तपासणीचे निष्कर्ष समोर आल्यावर डॉक्टरही आश्चर्यचकित झाले आणि मग ऑपरेशन करणे आवश्यक आहे, असे लवकरात लवकर ठरवले गेले.
एक्स-रेमध्ये स्पष्टपणे दिसून येत होतं की बरीच नाणी एकत्र पोटात जमा झाली आहेत. डॉक्टरांच्या टीमने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि रुग्णाच्या पोटातून 187 नाणी काढण्यात आली.
त्यापैकी 56 नाणी 5 रुपयांची, 51 नाणी 2 रुपयांची तर 1 रुपयाच्या नाण्यांची संख्या 80 होती. दयामाप्पा हा 58 वर्षीय व्यक्ती मानसिक रुग्ण असून गेल्या तीन-चार महिन्यांत ही सगळी नाणी हळूहळू गिळली, अशी माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली.
जेव्हा ओटीपोटात जास्त सूज येणे, सतत वेदना होणे आणि उलट्या होणे असह्य झाले, तेव्हा त्याला रुग्णालयात आणण्यात आले. कुटुंबातील सदस्य म्हणाला, “आम्हाला याबद्दल माहिती नव्हती, त्यांची मानसिक स्थिती चांगली नाही परंतु ते त्यांचे दैनंदिन काम व्यवस्थित करतात.
त्याने नाणी खाल्ल्याचे कोणालाही सांगितले नाही, काही दिवसांपूर्वीच त्याचे पोट फुगले आणि झोपताना खूप वेदना होऊ लागल्या. डॉ. ईश्वर कलबुर्गी म्हणाले की, हे एक आव्हानात्मक प्रकरण आहे.
पोट फुग्यासारखे फुगले होते आणि पोटात जागोजागी नाणी होती, ऑपरेशन थिएटरमध्ये सीआरच्या माध्यमातून नाणी दिसत होती. सध्या ही बातमी खूप व्हायरल होत आहे.