बंगळुरु : सोशल मीडियावर दररोज काही फोटो, व्हिडिओ शेअर केले जातात. यातले काही फोटो व्हायरल होतात. काही फोटो लोकांना खूप आवडतात. पण काहीवेळा काही आपत्तीजनक फोटोंवरुन मोठा वाद निर्माण होतो. सध्या सोशल मीडियावर असेच काही फोटो व्हायरल होत आहेत. यात एक टीचर विद्यार्थ्यासोबत रोमान्स करताना दिसतेय. अनेकांनी हे फोटो पाहून संतापाची भावना व्यक्त केलीय. कर्नाटकच्या चिक्कबल्लापुर जिल्ह्यातील मुरुगमल्ला गावातील हे प्रकरण आहे.
आरोपी शिक्षिकेच नाव पुष्पलता आहे. ती मुरुगमल्ला ग्राम सरकारी हायस्कूलमध्ये प्रिन्सिपल आहे. ज्या विद्यार्थ्यासोबत पुष्पलताने रोमँटिक फोटोशूट केलं, तो दहाव्या इयत्तेत आहे. एका एजुकेशनल ट्रिप दरम्यान हे व्हायरल फोटोशूट करण्यात आलं. या ट्रिपमध्ये स्कूलचा स्टाफही सोबत होता.
साडीचा पदर खेचतानाही काही फोटो
व्हायरल फोटोमध्ये विद्यार्थी प्रिन्सिपलला मिठी मारताना, किस करताना दिसतोय. दुसऱ्या फोटोमध्ये विद्यार्थ्याने प्रिन्सिपलला उचलून घेतलय. साडीचा पदर खेचतानाही काही फोटो काढणयात आले आहेत. ट्रिप दरम्यान एका दुसऱ्या विद्यार्थ्याने हे फोटोशूट केलय.
सोशल मीडियावर एकच संताप
विद्यार्थी आणि शिक्षिकेचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच लोकांनी आपल्या मनातील संताप व्यक्त केला. लोकांनी या फोटोवर नाराजी व्यक्त केली. टीचरला बरच काही सुनावलय. काही लोक टीचरवर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. अशा प्रकारे गुरु शिष्याच्या पवित्र नात्याची बदनामी सुरु आहे. टीचरसोबतच काही लोकांनी विद्यार्थ्याला सुद्धा बरच काही सुनावलय.
Where are we heading as a society ?
Pictures and videos from a romantic photoshoot of a government school teacher with a Class 10 student in Karnataka’s Murugamalla Chikkaballapur district, went viral, following which the student’s parents filed complaint with the Block… pic.twitter.com/WviIHtOP3J
— Amit Singh Rajawat (@satya_AmitSingh) December 28, 2023
प्रिन्सिपलवर काय कारवाई?
रोमँटिक फोटोशूटचे फोटो समोर आल्यानंतर विद्यार्थ्याच्या आई-वडिलांना धक्का बसलाय. त्यांनी या फोटोंवर नाराजी व्यक्त केली. याची तक्रार त्यांनी ब्लॉक शिक्षा अधिकाऱ्याकडे केली. प्रिन्सिपलच्या वर्तनाची चौकशी करण्याची मागणी केली. तक्रार मिळाल्यानंतर बीईओ वी उमा देवी यांनी शाळेचा दौरा केला व चौकशीनंतर प्रिन्सिपलला तात्काळ निलंबित केलं.