दिल्ली असो वा उत्तर प्रदेश… देशातील अनेक राज्यांमध्ये कडाक्याची थंडी जाणवत आहे. तर काही ठिकाणी तापमान 3 अंशापर्यंत खाली आले आहे. अशा थंडीत ब्लॅंकेट सोडून लोकांना घराबाहेर पडायचं नसतं. थंडीच्या लाटेमुळे शाळाही बंद ठेवण्यात आल्या आहेत. या थंडीच्या कडाक्याच्या थंडीत जेव्हा एका मुलाला त्याच्या आईने आंघोळ करायला सांगितली तेव्हा तो इतका रागावला की त्याने इमर्जन्सी कॉल करून पोलिसांना फोन केला. होय, त्या मुलाने आई-वडिलांवर रागावून ‘डायल 122’ वर फोन फिरवला. यानंतर पोलीस जेव्हा मुलाच्या घरी पोहोचले आणि सगळा प्रकार कळला तेव्हा हे प्रकरण चांगलंच व्हायरल झालं.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना हापूर जिल्ह्यातील आहे. एका गावात राहणाऱ्या एका कुटुंबातील नऊ वर्षांच्या मुलाने आईवर रागावून डायल 112 वर पोलिसांना फोन केला.
पोलिसांनी मुलाने सांगितलेल्या पत्त्यावर पोहोचून फोन करण्यामागचं खरं कारण शोधून काढलं, तेव्हा त्यांना हसू आवरता आलं नाही. खरं तर, मुलाने त्याच्या आईकडे तक्रार केली की तिने त्याला इतक्या थंडीत आंघोळ करण्यास सांगितले होते.
इतकंच नाही तर आई-वडिलांनी आपल्या स्टाइलनं केस कापू दिले नाहीत, अशी तक्रारही या मुलानं पोलिसांकडे केली आणि आता ते त्याला अशा थंडीत अंघोळ करायला सांगत आहेत. आई-वडील वारंवार आंघोळीसाठी हट्ट करत होते, त्यामुळे मुलाने डायल 112 नंबरवर फोन करून पोलिसांना फोन केला.