महिंद्रा कंपनीचे चेअरपर्सन आनंद महिंद्रा (Anand Mahindra) हे सोशल मीडिया(Social Media)वर खूप सक्रिय राहण्यासाठी ओळखले जातात. देशातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा त्यांच्या ट्विटर (Twitter) अकाऊंटवर दररोज काही ना काही व्हिडिओ किंवा पोस्ट शेअर करत असतात. ते एकतर प्रेरणादायी किंवा मजेदार असतात किंवा सौंदर्यानं नटलेले. आपल्या पेजवर फॉलोअर्सचे व्हिडिओ शेअर करायलाही तो विसरत नाही. बुधवारी त्यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये एका मुलानं खूप महत्त्वाचा संदेश दिला आहे.
प्रेरक व्हिडिओ
उद्योगपती आनंद महिंद्रा यांचं ट्विटर अकाउंट प्रेरक क्लिप आणि महत्त्वाच्या माहितीनं भरलेलं आहे. त्यांना नेहमीच वेगळे असे व्हिडिओ, फोटो शेअर करायला आवडतात. त्यांनी काही शब्द वापरून एका लहान मुलाची क्लिप शेअर केली आहे जी तुम्हाला पूर्णपणे प्रभावित करू शकते.
ट्विटरवर शेअर
त्यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर प्रोफाइलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, हा व्हिडिओ 2018चा आहे. यामध्ये एक लहान मुलगा मोटिव्हेशनल स्पीकर प्रेम रावत यांचा उतारा वाचताना दाखवला आहे. मुलगा त्याच्या जीवनात आनंद मिळवण्याचा, चिंता आणि रागावर मात करण्याच्या गरजांबद्दल बोलतो. एका कोपऱ्यात एडिटिंग, ट्रान्स्क्रिप्ट आणि टेक्स्ट केनीनं लिहिल्याचं दिसतंय. बाळाचं नाव केनी असण्याची शक्यता आहे.
This video’s from 2018. I believe this young man is quoting motivational speaker Prem Rawat. So he’s not a young Guru himself. But when children communicate, their innocence imparts their words with unparalleled power & impact. It’s made me re-examine ‘what I practice’ everyday. pic.twitter.com/PSks1ji8iE
— anand mahindra (@anandmahindra) January 19, 2022
नेटिझन्सकडून कौतुक
आनंद महिंद्रा यांनी व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, की ‘मला विश्वास आहे, की हा मुलगा प्रेरक स्पीकर प्रेम रावत यांचे शब्द पुन्हा सांगत आहे. तो स्वतः युवा गुरू नाही. पण जेव्हा मुलं संवाद साधतात तेव्हा त्यांची निरागसता त्यांच्या शब्दांना अतुलनीय शक्ती आणि प्रभाव देते. यामुळे मला ‘मी दररोज काय सराव करतो’ याचं पुन्हा परीक्षण करण्यास भाग पाडलं. ही क्लिप लाखाहून अधिक वेळा पाहिली गेली आहे आणि त्यावर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. प्रेम रावतच्या शब्दांची पुनरावृत्ती करणाऱ्या या लहान मुलानं त्याच्या बुद्धिमत्तेनं नेटिझन्सना प्रभावित केलं आहे.