मुंबई: देशाच्या कानाकोपऱ्यात खाद्यपदार्थांची चव बदलते. उत्तर प्रदेशात गेलात तर तिथलं जेवण आणि चव वेगळी असते, तर पंजाबला गेल्यास तिथल्या जेवणाची चव वेगळीच असते. दक्षिण भारतही असाच काहीसा आहे. तिथल्या जेवणाची चवही पूर्णपणे वेगळी असते. दक्षिण भारतात अनेकदा मसाला डोसा, इडली-सांबार यासारख्या गोष्टी खायला लोक आवडतात. मात्र, आता देशभरातील लोकांना अशा गोष्टी आवडू लागल्या असून काही जण त्यात प्रयोगही करताना दिसत आहेत. अशाच एका विचित्र फूड एक्सपेरिमेंटचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामुळे लोक संतप्त झाले आहेत.
खरं तर या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती चॉकलेट डोसा बनवताना दिसत आहे. किट-कॅट भरून त्याने डोसा तर बनवलाच आहे, पण डोसा बनवल्यानंतर वर किट-कॅट चॉकलेट टाकून एक अनोखी डिश तयार केली आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, या व्यक्तीने आधी पॅनवर एक मोठा डोसा बनवला आणि नंतर त्यात चॉकलेटसह विविध गोष्टी मिसळल्या. तुम्ही मसाला डोसा खाल्ला असेल, पण चॉकलेट डोसा तुम्ही क्वचितच पाहिला किंवा खाल्ला असेल. या विचित्र पदार्थाने लोकांना आश्चर्यचकित केले आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर या विचित्र डिशचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. द ग्रेट इंडियान्यूडी नावाच्या आयडीवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून, आतापर्यंत 2 लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे, तर 8 हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ लाईकही केला आहे.
त्याचबरोबर व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका युजरने ‘फूड लायसन्स रद्द करा भाऊ’ असं लिहिलं आहे, तर दुसऱ्या युजरने लिहिलं आहे, ‘भैया, यानंतर विष डोसाही लावा’. त्याचप्रमाणे आणखी एका युजरने कमेंट केली की, ‘यामुळे संपूर्ण मूड खराब झाला’, तर दुसऱ्या युजरने लिहिलं, ‘भाऊ, आता गोबर डोसा आणि गुटखा डोसाही बनवा’.