मुंबई : अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) पुष्पा सिनेमाची आजही तितकीच चर्चा होते. या सिनेमातील डायलॉग आजही पसंत केले जातात. या सिनेमातील अल्लू अर्जुनच्या स्टाईलला कॉपी केलं जातं त्यावर रील्स, व्हीडिओ बनवले जातात. पण त्याचा पुष्पा पुष्पराज मै झुकेगा नहीं साला या डायलॉगला पुरून उरणारे काही लोक समाजात आहेत. ज्याच्याकडे पाहिल्यानंतर या डायलॉगला अधिकचा अर्थ प्राप्त होतो. एसाच एक व्हीडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे. यात एक महिला स्कूटीवरून जाताना दिसत आहे. तेव्हा तिच्या समोर अचानक एक बस येऊन थांबते. यावेळी बसचा ड्रायव्हर आणि ही महिला दोघेही एकमेकांकडे पाहताना दिसत आहेत. मग प्रश्न निर्मा होतो की मागे हटणार? तसं पाहायला गेलं तर बसच्या तुलनेत स्कुटर मागे घेणं सोपं होतं. पण ही महिला माग हटली नाही.त्यानंतर मग बसचा ड्रायव्हर बस मागे घेतो.
एक महिला स्कूटीवरून जाताना दिसत आहे. तेव्हा तिच्या समोर अचानक एक बस येऊन थांबते. यावेळी बसचा ड्रायव्हर आणि ही महिला दोघेही एकमेकांकडे पाहताना दिसत आहेत. मग प्रश्न निर्मा होतो की मागे हटणार? तसं पाहायला गेलं तर बसच्या तुलनेत स्कुटर मागे घेणं सोपं होतं. पण ही महिला माग हटली नाही.त्यानंतर मग बसचा ड्रायव्हर बस मागे घेतो. पण तिच्या मागे न जाण्याचं कारण सोशल मीडियावर चर्चेत आहे. बस ड्रायव्हरने बस चुकीच्या दिशेने आणल्याने ही महिला गाडी मागे घेत नसल्याचं बोललं जातंय.
हा व्हीडीओ ‘memecentral.teb’ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हीडीओ शेअर करताना ‘झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए’ असं कॅप्शन देण्यात आलं आहे. एका नेटकऱ्याने “लेडी पुष्पा, मै हटुंगी नहीं साला!” अशी कमेंट केली आहे.