मुंबई : सोशल मीडियावर रोजच हजारो व्हिडीओ अपलोड केले जातात. यातील काही व्हिडीओ हे प्राणी तसेच पक्ष्यांचे असतात. यामधील प्राण्यांच्या व्हिडीओमध्ये थरारक पाठलाग, भांडण, तसेच शिकार दाखवलेली असते. याच कारणामुळे नेटकऱ्यांकडून अशा प्रकारचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केले जातात. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओसुद्धा शिकारीचाच आहे. यामध्ये एक बिबट्या आणि तरस यांच्यामध्ये मांस खाण्यासाठी चढाओढ लागली आहे. (Leopard smartly fooling Hyenda while eating hunted animal video goes viral on social media)
सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा अतिशय मजेदार आहे. यामध्ये एक बिबट्या आणि तरस दोघेही केलेल्या शिकारीचे मांस खात आहेत. यावेळी मांसाचा चांगला तुकडा खाता यावा म्हणून या दोघांमध्ये चढाओढ लागली आहे. व्हिडीओतील तरस हे चपळ असल्यामुळे ते बिबट्याला काही समजायच्या आत चांगले मांस फस्त करत आहे. याच कारणामुळे बिबट्या थोडा त्रासल्याचे दिसतेय. शेवटी या बिबट्याने समोरच्या तरसाला मागून धक्का दिला आहे.
बिबट्याने मागून धक्का दिल्यामुळे व्हिडीओतील तरस थोडे पुढे ढकलले गेले आहे. त्यानंतर तरस तोंडातील मांस खाण्यासाठी थोडे दूर गेल्याचे व्हिडीओमध्ये दिसतेय. हीच संधी साधून व्हिडीओतील बिबट्याने शिकारीला आपल्या मजबूत जबड्यात पकडले आहे. त्यानंतर लगेच या बिबट्याने बाजूच्या झाडावर झेप घेऊन शिकारीला आपल्यासोबत झाडावर नेले आहे.
दगाफटका झाल्याचे समजताच तरसाने बिबट्याकडे झेप घेण्याचा प्रयत्न केल्याचे आपल्याला व्हिडीओमध्ये दिसतेय. तसेच या तरसाने झाडावर चढण्याचाही प्रयत्न केल्याचे आपल्याला समजतेय. मात्र, त्याचा हा प्रयत्न यशस्वी झालेला नाही. त्यानंतर झाडावर गेलेला बिबट्या हा आरामात आपली शिकार खात आहे.
पाहा व्हिडीओ :
You have to be smart. pic.twitter.com/tT6xm2zbw5
— Life and nature (@afaf66551) June 12, 2021
दरम्यान, व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत नेमकी माहिती समजू शकलेली नाही. मात्र, त्याला Nature & Animals या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आले असून, नेटकरी या व्हिडीओला पसंद करत आहेत.
इतर बातम्या :
Video | सिंहाच्या जबड्यात रानडुकराची तडफड, पाहा शिकारीचा थरारक व्हिडीओ
Viral Video : ‘ढल गया दिन हो गई शाम’गाण्यावर जवानांची परेड, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
(Leopard smartly fooling Hyenda while eating hunted animal video goes viral on social media)