बिबट्याच्या हल्ल्याचा एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आसामच्या जोरहाटमध्ये ही घटना घडली आहे. जिथे बिबट्याने हल्ला करून 13 जणांना जखमी केले. बिबट्या पळून जात असताना रस्त्यावर उभ्या असलेल्या गाडीच्या काचेवर आदळला त्यानंतर त्याने वेगाने पळ काढला. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय, जे आता धोक्याबाहेर आहेत.
21 सेकंदाच्या या व्हायरल क्लिपमध्ये बिबट्या घराच्या आवारातून उडी मारून रस्त्यावर पोहोचून तिथे उभ्या असलेल्या वाहनावर आदळताना दिसत आहे.
सुदैवाने गाडीच्या काचा बंद होत्या. अशा परिस्थितीत बिबट्या कसातरी स्वतःला सांभाळतो आणि तिथून पळून जातो. दुसऱ्या कारमध्ये बसलेल्या व्यक्तीने ही घटना कॅमेऱ्यात कैद केली, ज्याचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.
या व्हिडिओला 8 हजारांहून अधिक व्ह्यूज आणि जवळपास दोनशे लाईक्स मिळाले आहेत. तसेच, ही क्लिप पाहून युझर्स आश्चर्यजनक प्रतिक्रिया देत आहेत.
एएनआय या वृत्तसंस्थेने 27 डिसेंबर रोजी हा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला होता. “आसामच्या जोरहाटमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात तीन वन कर्मचाऱ्यांसह 13 जण जखमी झाले आहेत.
#WATCH | Assam: 13 persons including three forest staff were injured after being attacked by a leopard in Jorhat. All injured persons were immediately admitted to a local hospital. All the injured persons are out of danger: Mohan Lal Meena, SP, Jorhat (26.12) pic.twitter.com/TQ92Z248NR
— ANI (@ANI) December 27, 2022
सर्व जखमींना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. जोरहाटचे एसपी मोहन लाल मीना म्हणाले की, हल्ल्यात जखमी झालेले धोक्याबाहेर आहेत. ही घटना सोमवारी, 26 डिसेंबरला घडलीये.