मुंबई : सिंह जंगलाचा राजा. त्याच्या नादी सहसा कुणी लागत नाही. त्याच्याशी पंगा घेण्याची कुणीही हिंमत दाखवत नाही. पण एका व्यक्तीने ती हिंमत दाखवलीय. त्याने थेट सिंहाच्या जबड्यात हात घातलाय. त्याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर (social media) व्हायरल होत आहे. यातून सिंहाशी पंगा घेणं दिसतं तितकं सोपं नाही हेच लक्षात येत. हा व्हीडिओ आफ्रिकेतील एका प्राणीसंग्रहालयातील आहे जमैकन प्राणी (Jamaica Zoo) संग्रहालयातील हा व्हीडिओ सध्या जगभर व्हायरल (viral video) होतोय. या प्राणी संग्रहालयात काही लोक फिरण्यासाठी आलेले पाहायला मिळतात. यातली एक व्यक्ती प्राणीसंग्रहालयात सिंहाला पाहून अतिउत्साही होते. भेट देण्यासाठी गेल्याचं व्हीडिओमध्ये दिसत आहे. पिंजऱ्यातील सिंहाला पाहून तो त्याची थट्टा करायला लागतो. पण त्याची ही थट्टा त्यांच्या अंगाशी येते. पुढं जे घडतं त्यामुळे तो ही घटना आयुष्यभर लक्षात राहील.
एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यातून सिंहाशी पंगा घेणं दिसतं तितकं सोपं नाही हेच लक्षात येत. हा व्हीडिओ आफ्रिकेतील एका प्राणीसंग्रहालयातील आहे जमैकन प्राणीसंग्रहालयातील हा व्हीडिओ सध्या जगभर व्हायरल होतोय. या प्राणी संग्रहालयात काही लोक फिरण्यासाठी आलेले पाहायला मिळतात. यातली एक व्यक्ती प्राणीसंग्रहालयात सिंहाला पाहून अतिउत्साही होते. भेट देण्यासाठी गेल्. व्हिडिओमध्ये दिसत आहे. पिंजऱ्यातील सिंहाला पाहून तो त्याची थट्टा करायला लागतो. पण त्याची ही थट्टा त्यांच्या अंगाशी येते. पुढं जे घडतं त्यामुळे तो ही घटना आयुष्यभर लक्षात राहील.
सिंहाला जाळीत ठेवण्यात आलं आहे. तो या जाळीतून आपला हात सिंहाजवळ नेतो. तो सिंहाला गोंजारतो, नंतर थेट त्याच्या तोंडात हात घालतो. काही सेकंद सिंह शांत राहातो पण मग मात्र तो चिडतो अन् त्याची बोटं आपल्या दातांनी घट्ट पकडतो. तो पुढचे काही सेकंद त्याचा हात सोडत नाही. त्याच्या जबड्यातून आपला हात सोडवण्यासाठी ही व्यक्ती अथक प्रयत्न करते. तेव्हा कुठे शेवटी सिंह त्याचा हात सोडतो.
Show off bring disgrace
The lion at Jamaica Zoo ripped his finger off. pic.twitter.com/Ae2FRQHunk
— Ms blunt from shi born ?? “PRJEFE” (@OneciaG) May 21, 2022
हा व्हीडिओ @OneciaG नावाच्या ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे.याला आतापर्यंत साडे तीन मिलीयन लोकांनी पाहिलंय. तर 81 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केलंय.