मुंबई: सर्कसमध्ये प्राणी पाहिलेले आठवतात का? आपण लहान असताना सर्कसमध्ये प्राणी आणि त्यांनी मारलेले स्टंट्स सर्रास बघायला मिळतात. अलीकडच्या काळात सर्कसमध्ये प्राण्यांचा वापर होत असल्याबद्दल चिंता वाढू लागली आहे. काही देशांनी सर्कसमध्ये वन्यप्राण्यांच्या वापरावर बंदी घातली आहे, तर काही देशांनी अजूनही परवानगी दिलेली आहे. नुकतीच चीनमधील लुओयांग शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. चीनच्या हेनान प्रांतातील एका सर्कसमध्ये दोन सिंह आपल्या आवारातून पळून गेल्याने प्रेक्षकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आणि लोकांना पळून जावे लागले.
दरवाजातून सिंह पळून गेले होते, नंतर त्यांना ब्रीडरने पकडून पुन्हा पिंजऱ्यात ठेवले. यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी सर्कसच्या हलगर्जीपणामुळे सुरक्षारक्षकाला निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले असून त्याची चौकशी सुरू आहे. प्रत्यक्षदर्शींनी असा दावा केला आहे की, जिथून सिंह पळून गेले होते, त्या पिंजऱ्याचा दरवाजा सुरक्षितपणे बंद नव्हता, ज्यामुळे सिंह पळून गेला. सर्कसच्या बाहेर एक सिंह फिरताना दिसल्याने स्थानिक आणि प्रेक्षकांमध्ये भीतीचं वातावरण होतं.
Luoyang, Henan, China
Everything went wrong!
It is clear that these animals do not want to do these silly tricks. Leave the animals alone and let them live their lives in peace.
I think these lions look skinny. How are they punished now? Beating and starving?#animalcruelty pic.twitter.com/ypkV4HNx7c
— We Are Not Food (@WeAreNotFood) April 16, 2023
या घटनेमुळे अनेक दिवसांपासून सर्कसमध्ये प्राण्यांच्या वापराविरोधात मोहीम राबवणाऱ्या प्राणी हक्क कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती. सर्कसमध्ये प्राण्यांचा वापर क्रूर आणि अमानुष आहे, कारण त्यांना बरेचदा कठोर प्रशिक्षण पद्धतींना सामोरे जावे लागते आणि छोट्या जागांमध्ये ठेवले जाते, असा त्यांचा युक्तिवाद आहे. तर काही लोक असा युक्तिवाद करत आहेत की सर्कसमुळे लोकांना जंगली प्राणी जवळून पाहण्याची संधी मिळते. सर्कसमधून सिंह पळून जाण्यासारख्या घटना धक्कादायक आहेत. असे सादरीकरण केवळ प्राण्यांसाठीच नव्हे तर प्रेक्षकांसाठीही धोकादायक असते.