मुंबई: समजा तुम्ही रस्त्यानं जात आहात आणि तुम्हाला अचानक एखाद्या गाडीवर सिंह दिसला तर? मग काय तुम्ही तो सिंह बघून पळून जाल. लांबून बघाल? जवळ तर नक्कीच जाणार नाही इतकं तर आहेच. एकदा एक माणूस मार्केट मध्ये फिरत असतो आणि त्याला अचानक एका गाडीवर सिंह बसलेला दिसतो. या घटनेचा त्याने व्हिडीओ काढलाय. आपल्याला सुद्धा हा सिंह स्पष्ट दिसतो. मार्केट मध्ये हा सिंह निवांत एका गाडीवर इकडे तिकडे बघत उभा असतो. व्हिडीओ बघताना आपला सुद्धा थरकाप उडतो मग ज्या लोकांनी खरंच हे दृश्य पाहिलं असेल त्यांचं काय झालं असेल?
नुकताच हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा व्हिडिओ कधीचा आणि कुठचा आहे याची पुष्टी झालेली नाही, परंतु स्कूटीचा नंबर पाहता हा व्हिडिओ भारताबाहेरील असल्याचे दिसून येत आहे. हा व्हिडिओ रस्त्यावरून जाणाऱ्या एका व्यक्तीने मोबाईलमध्ये कैद केला आहे. कल्पना करा की पाठीमागून सिंहासारखा दिसणारा प्राणी आहे. पण समोरून बघताच सिंहाऐवजी दुसरं काहीतरी दिसलं, तर एकतर ती तुमच्या डोळ्यांची फसवणूक असेल किंवा आणखी काहीतरी. असाच एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर समोर आला आहे जो तुमच्या फसवेल.
त्याने पुढे जाऊन त्या प्राण्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर तो सिंह नव्हता तर काहीतरी वेगळंच होतं. किंबहुना सिंहाचा वेश परिधान केलेला हा कुत्रा होता आणि त्याने गॉगल देखील घातलेला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच लोकांच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. कुणी हा व्हिडिओ काढणाऱ्याच कौतुक करत आहे, तर कुणी सिंहासारखा बसलेल्या या कुत्र्याचं कौतुक करत आहे. तर काही लोक या कुत्र्याच्या मालकाचे कौतुक करत आहेत, ज्याने त्याला स्कूटीवरसिंह बनवून बसवला आहे. सध्या लोक हा व्हिडिओ शेअर करत असून तो जगभरात व्हायरल झाला आहे.