मेस्सी हा देवदूत नाही! आनंद महिंद्रा यांचं ट्विट व्हायरल

| Updated on: Dec 20, 2022 | 12:20 PM

बिझनेसमन आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर असं काही लिहिलं आहे, ज्याची चर्चा सुरू आहे.

मेस्सी हा देवदूत नाही! आनंद महिंद्रा यांचं ट्विट व्हायरल
Lionel Messi Anand Mahindra
Image Credit source: Social Media
Follow us on

संपूर्ण जगाला फुटबॉल वर्ल्ड कपचा फिव्हर चढलाय. मॅच व्हायच्या आधी, मॅच सुरु असताना, मॅच झाल्यावर फुटबॉल फिव्हर आहे तसाच आहे. मेस्सी चं कौतुकच कौतुक होतंय. अर्जेंटिनाचा स्टार लिओनेल मेस्सीचे कौतुक होत असताना काही लोकही मेस्सीला मसीहा आणि इतर उपमा देऊन सन्मान देत आहेत. दरम्यान, बिझनेसमन आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर असं काही लिहिलं आहे, ज्याची चर्चा सुरू आहे. मेसीचा फोटो शेअर करताना त्यांनी आपला मुद्दा मांडला आहे.

आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या मेस्सीच्या फोटोवर ‘मसीहा’ असं लिहिलं आहे. हाच फोटो शेअर करत आनंद महिंद्रा यांनी लिहिलं, “आजच्या सोमवारचं मोटिव्हेशन वर्ल्ड कपमधून का नसू शकतं? असामान्य शक्ती म्हणून मेस्सी कडे पाहिले जाते. पण मेस्सी हा एक साधा माणूस होता ज्याने कठोर परिश्रमाने विलक्षण गोष्टी साध्य केल्या आहेत.”

या कॅप्शनच्या शेवटी त्याने असेही लिहिले आहे की, तुम्हीच तुमचा मसिहा व्हा. आनंद महिंद्रा यांच्या या ट्विटची चर्चा होत आहे.

काही लोक त्याच्याशी असहमती दर्शवताना दिसत आहेत, तर अनेक जण आनंद महिंद्रा यांनी योग्य लिहिलं आहे असं लिहित आहेत. एका यूजरने असेही लिहिले आहे की, आनंद महिंद्रा यांना मेस्सी सोबत नाही तर या पोस्टर सोबत समस्या आहे.

लिओनेल मेस्सीने अर्जेंटिनाला विश्वविजेता बनवून इतिहास रचला. पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सचा ४-२ असा पराभव करून अर्जेंटिनाने फिफा विश्वचषक जिंकला.

संपूर्ण जग अर्जेंटिना आणि मेस्सीचे अभिनंदन करत आहे. सध्या आनंद महिंद्रा यांचं हे ट्वीट प्रचंड व्हायरल होत आहे.