जंगल सफारीदरम्यान असे अनेक व्हिडिओ समोर येतात, ज्यामुळे लोकांची अवस्था वाईट होते. तसे तर जंगलात सिंह किंवा सिंहिणीला पाहून भल्याभल्यांची अवस्था बिकट होते. पण कल्पना करा की जंगल सफारीला गेल्यावर अचानक एखादी सिंहीण गाडीत शिरली तर काय होईल. पर्यटकांच्या जीपमध्ये सिंहीण शिरल्याने असाच एक प्रकार समोर आला आहे.
खरंतर त्याचा एक व्हिडिओही समोर आला आहे. जंगल सफारीच्या वेळी अनेक पर्यटक ओपन जीपमधून फिरत असल्याचं दिसून येतं. यापैकी एक जण मोबाइलवर वाघिणीचे रेकॉर्डिंग करत आहे.
दुसऱ्याच क्षणी असं काहीतरी घडतं, ज्यामुळे लोक आश्चर्यचकित होतात. गाडीच्या दिशेने धावत अचानक सिंहीण गाडीत उडी मारते.
त्यानंतर घडलेला प्रकार व्हायरल झाला. ती सिंहीण तिथे बसलेल्या सर्व लोकांकडे जाऊन खेळू लागते, ती सिंहीण त्यांच्यावर अजिबात हल्ला करत नाही.
New wildlife experience ? pic.twitter.com/1J74oTKgWW
— OddIy Terrifying (@OTerrifying) November 8, 2022
कदाचित ती पाळीव सिंहीण होती जिने कोणालाही इजा केली नाही. पण जेव्हा ती उडी मारून जीपमध्ये आली तेव्हा सगळेच घाबरले.
व्हायरल व्हिडीओमध्ये असं दिसतंय की, काही लोक एका टुरिस्ट व्हेइकलमधून जंगल सफारीसाठी बाहेर गेले होते. इतक्यात अचानक ही सिंहीण त्यांच्यासमोर येते.
सिंहीणीला पाहून सुरुवातीला भीतीमुळे लोकांची अवस्था बिकट होते. पण त्यानंतर जे घडते ते आश्चर्यकारक आहे. या व्हायरल व्हिडिओवर लोकही प्रतिक्रिया देत आहेत.