मुंबई: सिंह हा जंगलचा राजा असतो. लहानपणापासून आपण सिंहाच्या इतक्या गोष्टी ऐकलेल्या आहेत की आपण त्या गोष्टींमध्ये कधीच सिंहाला घाबरताना किंवा पळून जाताना ऐकलेलं नाही. त्याहीवर म्हणजे सिंह कुठल्या प्राण्याला बघून पळून जाईल हे तर आपल्यासाठी कल्पनेपलीकडचं आहे हो ना? पण आपण बलाढ्य सिंहाबद्दल ऐकलं आहे त्याचाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय. हा सिंह एका प्राण्याला बघून पळून गेलाय. होय!
या व्हिडिओमध्ये दोन गेंडे दिसतायत. त्याच रस्त्यावर पुढे दोन सिंह आरामात झोपलेत. अचानक दोन्ही सिंह उभे राहतात आणि गेंड्यांना बघून तिथून निघून जातात. गेंडे जसजसे जवळ येतात तसतसे सिंह एका बाजूला येऊन गवताळ प्रदेशात जातात. गेंड्यांना पाहिल्यानंतर सिंह घाबरून गवतात जातात. गेंडे जसजसे जवळ येतात सिंह तसतसे लांब जाऊ लागतात.
Нам, царям, за вредность молоко надо давать! ?
? @digitaltourism_worldwide pic.twitter.com/QR5Ax7255B— Этна (@EtoEtna) April 3, 2023
गेंडे अतिशय बलाढ्य असतात. ट्विटरवर शेअर केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तो मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे. सिंहाचा हा अवतार बघून इंटरनेट युजर्सही हैराण झाले आहेत. अनेक लोकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.