गांधीनगर: उदरनिर्वाहासाठी रस्त्यावर सामान विकणारी मुले तुम्ही पाहिली असतील. उपजीविकेसाठी कष्ट करून शाळेत जाणारी मुले पाहून मन हेलावून जाते. गुजरातमधील अहमदाबादमधील एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक लहान मुलगा रस्त्यावर कि चेन विकताना दिसत आहे.
हा व्हिडीओ इंस्टाग्राम पोस्ट करण्यात आला असून तो आतापर्यंत 74 लाख लोकांनी पाहिला आहे. हा मुलगा फूटपाथवर बसून ट्रॅफिक सिग्नलवरून जाणाऱ्या वाहनचालकांना कि चेन विकताना दिसतोय. या व्हिडिओला आणखी वेदनादायक बाब म्हणजे मुलाच्या उजव्या पायाला दुखापत झाली आहे. दुखापत वाढू नये म्हणून त्याने आपला पाय कापड आणि पिशिवीने बांधलाय.
या व्हिडीओ हृदय पिळवटून टाकणारा आहे. एका युजरने कमेंट केली की, “तो भीक मागत नाहीये, मला त्याच्याबद्दल आदर आहे, दया नाही.” केवळ व्हिडिओ बनवून ते सोशल मीडियावर अपलोड करू नका. हे पाहून माझं मन दुखतं, काश मी त्याच्या मदतीला हजर असतो.”
तिसऱ्या युजरने लिहिले की, ‘मी स्वस्तिक स्क्वेअरवर या लहान मुलाला पाहिले आहे. आणखी एका नेटकऱ्याने लिहिले की, “तो जखमी झाला असला तरी त्याने भीक न मागता काम करणे पसंत केले, देव या मुलाला आशीर्वाद देईल.”