Little child funny video : सोशल मीडियावर काय व्हायरल होईल याचा अंदाज बांधणे कठीण आहे. यातील काही व्हिडिओ पाहताना तुम्हाला विचार करायला भाग पाडतो, तर काही व्हिडिओ इतके मजेशीर (Funny) असतात, की तुम्ही तुमच्या हसण्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही. सध्या सोशल मीडियावर एका मुलाचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral) होत आहे, जो पाहून लोक म्हणत आहेत, की हा ऑनलाइन क्लासचा (Online Classes) परिणाम आहे. व्हिडिओमध्ये (Video) लहान मूल स्कूटीचे इंग्रजीत नाव वाचताना दिसत आहे. पण शेवटी त्याने सांगितलेल्या स्कूटीचे नाव ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. काही सेकंदांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की स्कूटीच्या सीट कव्हरवर एक लहान मूल इंग्रजी शब्दाची अक्षरे वाचताना दिसत आहे.
व्हिडिओमध्ये दिसत आहे, की मूल सर्व अक्षरे अचूकपणे लिहिते. मात्र यानंतर जे काही घडते ते ऐकून यूझर्सना हसू आवरता येत नाही. खरं तर, सर्व अक्षरे बरोबर सांगितल्यावर, मूल त्याला स्कूटी सांगतो. आपण पाहू शकता, की त्या वाहनाचे नाव स्कूटी नाही. आता तुम्ही कल्पना करू शकता की ऑनलाइन क्लासेसचा मुलांवर काय परिणाम होईल.
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर comedynation.teb नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. एका दिवसापूर्वी अपलोड करण्यात आलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत सुमारे एक हजार लोकांनी लाइक केले आहे, तर अनेकांनी इमोटिकॉन्सच्या माध्यमातून यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. याशिवाय काही लोकांनी कमेंट सेक्शनमध्ये मित्रांना टॅग करून ते पाहण्यासाठी आमंत्रित केले आहे.
कोरोना महामारीने गेल्या दोन वर्षात खूप विद्ध्वंस केला आहे. त्याचा धोका पाहता अनेक देशांमध्ये शाळा आणि महाविद्यालये अजूनही बंद आहेत. या नवीन सामान्य जीवनाने ऑनलाइन वर्गांना जन्म दिला आहे, परंतु त्याचा लहान मुलांवरही नकारात्मक परिणाम झाला आहे. यामुळेच कोविडच्या काळात आता शाळा सुरू करण्याची मागणी होऊ लागली आहे. गेल्या आठवड्यापासून देशातील अनेक राज्यांमध्ये शाळा सुरू झाल्या आहेत.