Video : हृदयाचे ठोके चुकवणारा हा व्हिडिओ…साप पायाजवळ आला अन्…

| Updated on: May 30, 2023 | 3:49 PM

Video : घरातील चार पाच वर्षांची मुलगी निरागसपणे घरात वावरत होती. घरात कोणी भीतीदायक पाहुणा येऊन बसला आहे, याची तिला कल्पना नव्हती. परंतु काही क्षणाचा हा व्हिडिओ हृदयाचे ठोके चुकवून जातो.

Video : हृदयाचे ठोके चुकवणारा हा व्हिडिओ...साप पायाजवळ आला अन्...
snak
Follow us on

बेळगाव : हृदयाचे ठोके चुकवणारे काही क्षण असतात. या काही क्षणांमध्ये जन्म अन् मृत्यू काय असते, हे सहज समजते. म्हणतात ना, काळ आला होता पण वेळ आली नव्हती…तसाच प्रकार या व्हिडिओमध्ये दिसणार आहे. लहान मुलगी घरात खेळत असताना अचानक सापाजवळ आली अन् काय झाले…हे या व्हिडिओमध्ये दिसणार आहे. शेवटी काळ आला होता पण वेळी आली नव्हती…असे म्हणावे लागणार आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये

हे सुद्धा वाचा

सापाचे नाव एकले तरी अनेकांना घाम फुटतो. सापाची भीती अनेकांना असते. साप या शब्दानेही अनेकांची भीतीने गाळण उडते. दैव बलवत्तर म्हणून सापाच्या तावडीतून मुलगी बचावली आहे. ही घटना आहे कर्नाटकमधील बेळगावमधील. बेळगावमधील हलगा या गावातील सुहास सैबन्नावर यांच्या घरी लहान मुलगी खेळायला येत होती. त्याचवेळी दरवाजा कडेला आला होता. त्या मुलीला काहीच माहीत नव्हते.

 

ती निरागसपणे जात होती. घरातील दाराजवळ साप थांबला होता. अन् दाराजवळ मुलगी येऊन दार उघडणार तोपर्यंत सापाने दुसरीकडे आपले तोंड वळवले. त्याचवेळी मुलीचे लक्ष सापाकडे गेली. ती घाबरली पण त्या दोन सेंकदात धैर्य ठेवत दार ओढले अन् घरात धाव घेतली. सुदैवाने दैव बलवत्तर म्हणून ती मुलगी सापाच्या तावडीतून बचावली. घरात आलेला साप नंतर सर्पमित्रांनी पकडला अन् त्याला जंगलात सोडून दिले. परंतु घरातील इतर लोक हे दृश्य पाहून थंडच पडले.