सोशल मीडियावर प्राण्यांच्या लढाईचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. हे व्हिडिओ पाहिल्यानंतर, जिथं आपण अनेक वेळा आश्चर्यचकित होतो, तिथं असे अनेक व्हिडिओ देखील आहेत, जे आपल्याला हसवतात. असाच एक व्हिडिओ अलीकडच्या काळात समोर आला आहे. तो पाहिल्यानंतर तुम्ही सुद्धा तुमचे हास्य नियंत्रित करू शकणार नाही. ( Lizard attacked dog funny video goes viral on social media)
आपल्या सर्वांना माहित आहे की, जेव्हा कुत्रे सतत भुंकतात तेव्हा काहींना खूप राग येतो, त्यांचा आवाज काहींना सहन होत नाही. त्यामुळेच काही लोक भुंकणाऱ्या कुत्र्यांना पळवून लावतात. पण कुत्र्यांच्या भुंकण्याचा त्रास फक्त माणसांनाच होतो असं नाही, तर अनेक प्राणीही आहे, ज्यांना कुत्र्यांचं हे भुंकणं आवडत नाही. असाच एक व्हिडीओ आता समोर आला आहे, जो पाहिल्यानंतर तुम्ही खळखळून हसाल.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक कुत्रा सरड्यापासून काही अंतरावर भुंकत आहे, समोर एक मोठा सरडा दिसत आहे, कुत्रं या सरड्यावर जोरजोरात भुंकत आहे, कुत्र्याच्या आवाजाने अचानक सरडा चिडतो, आणि सरळ त्याच्यामागे धावायला लागतो. त्यानंतर कुत्रा शेपटी गुंडाळून तिथून पळ काढतो.
व्हिडीओ पाहा
It’s all fun and games until the dinosaur starts chasing you. pic.twitter.com/x34ZZioD11
— Jamie Gnuman197… (@Jamie24272184) October 17, 2021
हा मजेदार व्हिडिओ @Jamie24272184 नावाच्या युजरने शेअर केला आहे. ज्याला बातमी लिहेपर्यंत तीन हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यासोबतच अनेकांनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
सोशल मीडिया युजर्सना हा व्हिडिओ खूपच मजेदार वाटतो. अनेकांनी ही मजेदार कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिले, ‘कुत्रा ज्या प्रकारे धावला, तो खरोखरच मजेदार होता.’ तर दुसऱ्याने लिहिले, ‘हा मजेदार व्हिडिओ बघून मजा आली. याशिवाय अनेकांनी इमोजीजद्वारे आपल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत.
हेही पाहा: