मुंबई: असं म्हटलं जातं की, मुलींना सजावटीची खूप आवड असते. जेव्हा जेव्हा त्यांना घराबाहेर पडायचं असतं तेव्हा त्यांचा मेकअप सुरू होतो. सर्वच मुली असं करत नसल्या तरी बहुतांश मुली आणि महिलांच्या बाबतीत हीच स्थिती असते. लग्न समारंभात किंवा पार्ट्यांमध्ये जवळपास सर्वच मुली आणि महिलांच्या चेहऱ्यावर मेकअप असतो हे तुमच्या लक्षात आलं असेलच, पण तुम्ही कधी पालीने मेकअप केलेला पाहिलं आहे का? होय, असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि तुम्हालाही हसू येईल.
नुकताच असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यात एक पाल आपला मेकअप करताना दिसत आहे. कधी त्या पालीच्या पायावर नेल पेंट लावली जातेय तर कधी त्या तिचा डोक्याचा मसाज होतोय. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. विशेष म्हणजे पालीच्या चारही पायांना नेलपॉलिश लावली जातेय. पालीने गळ्यात एक छोटी साखळीही घातली आहे, जी बहुधा सोन्याची आहे. अशी पाल तुम्ही क्वचितच पाहिली असेल. आता असे दृश्य पाहून तुम्हाला आश्चर्य वाटणार नसेल तर दुसरं काय होईल.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर हा मजेशीर व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत 13 हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ लाइक केला आहे आणि विविध मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. कुणी म्हणत आहे की ग्रूमिंग करून पाली गोंडस दिसतात, तर कुणी म्हणत आहे की ‘मला वाटतं पालीला नेल पेंट लावायलाही आवडतं’. त्याचप्रमाणे आणखी एका युजरने मजेशीर पद्धतीने लिहिले आहे की, ‘आता मी पालीला घाबरणार नाही’.