विमानात प्रवास करताना शक्यतो शांतपणे, प्रवास करणं पसंत करतात. लांब पल्ल्याच्या प्रवासात काहीजण झोप घेतात. विमानात प्रवास करणारे प्रवासी हे सोफिस्टिकेटेड समजले जातात. त्यामुळे ना विमानात कुठला आवाज असतो, ना कुणी मोठ्या आवाजात एकमेकांशी बोलतं. पण, भारतीयांना याबाबतीत तोड नाही. असाच एक व्हिडीओस सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये भारतीय प्रवासी चक्क विमानात गाणी गात आहेत. (local train atmosphere shown in flight woman sang the song passenger started clapping viral video)
फ्लाइटमध्ये लोकल ट्रेनचे वातावरण
मुंबई लोकलने तुम्ही प्रवास केला असेल, तर तुमच्या लक्षात येईल, लोकलमध्ये किती प्रकारचे आवाज ऐकू येतात, कुणी गाणी म्हणत असतं, कुणी आपली गाऱ्हाणी सांगत असतं, कुणी सीटवरुन भांडत असतं, तर कुणी मोबाईलवर गाणी लावून ऐकत असतं. असाच काहीसा प्रसंग विमानात घडला, इथं एका महिलेने फ्लाईटमध्ये गाणं म्हणत प्रवाशांचं मनोरंजन केलं. बॉलीवूडचं जुनं गाणं ‘सज रही गली तेरी अम्मा’ हे गाणं गायलं. दिग्गज अभिनेते मेहमूद यांच्या कुंवारा बाप चित्रपटातील हे गाणं आहे. महिलेने गाणे सुरू करताच जवळ उभे असलेले लोक टाळ्या वाजवू लागले. व्हिडीओ पाहून असे वाटेल की जणू ते फ्लाइट नसून लोकल ट्रेन आहे.
व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी विचित्र प्रतिक्रिया दिल्या
काही सेकंदांचा हा व्हिडिओ पाहून लोक विचित्र कमेंट्स करत आहेत. सोशल मीडियावर लोकांना हा व्हिडिओ खूप आवडत आहे. मोहम्मद मगदी नावाच्या अकाऊंटद्वारे हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड होताच लोकांना तो खूप आवडला. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, ‘पंजाबला जाणाऱ्या फ्लाइट्स नेहमी अशा असतात’.
हेही पाहा: