भारतात लग्नसोहळ्यात डान्स खूप महत्त्वाचा असतो. हल्ली लग्नाला येणारे नातेवाईकही कोरिओग्राफरकडून नृत्य शिकतात आणि फंक्शन्समध्ये परफॉर्म करतात. अशात लग्नातील डान्सचे अनेक व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. यातील काही वरातींच्या नृत्याचे असतील, तर काही वर-वधूच्या दमदार नृत्याचे असतील. पण या व्हायरल व्हिडीओ मध्ये नववधूने स्टेजला आग लावलीये.
या व्हिडीओमध्ये एक नवरी दिसत आहे, जी तिच्या ब्रायडल लुकमध्ये कमाल आहे. पण तिच्या सौंदर्याबरोबरच तिने नृत्याने अनेकांची मनं जिंकलीयेत. सर्वात आधी सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हायरल व्हिडिओ तुम्ही पाहा…
या व्हिडीओमध्ये नवरी ‘कुछ कुछ होता है’ सिनेमातील ‘साजन जी घर आये’ या गाण्यावर जोरदार डान्स करत आहे. नववधूचा आत्मविश्वासही खरोखरच आश्चर्यकारक आहे. जड ड्रेस परिधान करणे आणि नृत्याच्या स्टेप्स करणे आणि एक्सप्रेशन देणे हे खूप कठीण काम आहे.
या व्हिडीओमध्ये नववधूच्या डान्सवर प्रतिक्रिया देण्यापासून अनेक जण स्वतःला रोखू शकले नाहीत. लग्नाला आलेल्या सर्व पाहुण्यांनाही आश्चर्याचा धक्का बसलाय.