हे पहा हे “जनम जनम का साथ है तुम्हारा हमारा” वालं जोडपं! जोडीने स्टंट मारतायत

| Updated on: Nov 18, 2022 | 3:43 PM

...त्याची बायको त्याच्या मागच्या सीटवर बसली होती!

हे पहा हे जनम जनम का साथ है तुम्हारा हमारा वालं जोडपं! जोडीने स्टंट मारतायत
husband wife stunt
Image Credit source: Social Media
Follow us on

इन्स्टाग्रामची दुनिया ‘अड्डा ऑफ रिल्स’ बनली आहे, जिथे तुम्हाला रोमँटिक ते थरारक कंटेंट मिळेल. कुणी अफलातून डान्स करतोय, तर कुणी खतरनाक स्टंट करतंय. अशा सगळ्या क्लिप्स तुम्ही पाहिल्या असतील. पण आज आम्ही तुमच्यासाठी एका देसी कपलचा एक स्टंट व्हिडिओ घेऊन आलो आहोत, जो पाहून तुम्ही वेडे व्हाल. खरंतर बायकोला बाईकवर बसवून हा माणूस असा खतरनाक स्टंट करतो की, तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.

रॉयल एनफिल्ड बाइकवरून (बुलेट) एक जोडपं प्रवास करत असताना त्या व्यक्तीने असा खतरनाक स्टंट केला की त्याला पाहून लोक त्या व्यक्तीवर खूप टीका करत आहेत.

या क्लिपमध्ये काळ्या रंगाचा शर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स घातलेला एक माणूस बुलेट चालवत असल्याचं आपण पाहू शकतो, त्याची बायको त्याच्या मागच्या सीटवर बसली होती!

तो माणूस आधी चालत्या बाईकच्या सीटवर बसतो आणि मग हळूहळू हँडल सोडून सरळ सीटवर उभा राहतो. या काळात ती स्त्री मागच्या सीटवर दगडासारखी बसलेली असते. ती अजिबात हलत नाही. ती जर हलली असती तर नक्कीच या दोघांचाही जीव गेला असता.

१६ नोव्हेंबर रोजी इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. २४ लाखांहून अधिक व्ह्यूज आणि ९५,००० हून अधिक लाईक्स या व्हिडिओला मिळाले आहेत.

त्याचबरोबर हा धक्कादायक स्टंट पाहून सर्वच युझर्स आपला फीडबॅक देत आहेत. काहींनी हे खूपच धोकादायक असल्याचे म्हटले आहे. आणखी एकाने लिहिले- “खरे नाही, हे तर रील कपल गोल” आहे. काही युझर्सनी लाइक्स आणि व्ह्यूजसाठी लोक जीवाची बाजी लावतात अशी प्रतिक्रिया दिलीये.