तुम्ही याआधी अनेकदा मागच्या दोन पायावर चालणारे कुत्रे बघितले असतील मात्र, पुढच्या दोन पायावर चालणार कुत्रा क्वचितच पाहिला असेल. आत्ताच्या कडाक्याच्या थंडीत अनेकदा आपल्या हातापायची बोट गारठतात, ग्रामीण भागातील थंडी तर रात्री चादर घेतल्याशिवाय किंवा स्वेटर घाल्याशिवाय बाहेर पडू देत नाही. ही झाली नॉर्मल थंडी, मात्र या दिवसात जर बर्फाळ प्रदेशात बर्फावरून चालायचं असेल तर? अनेकांना हा प्रश्न वाचूनच हूडहूडी भरली असेल. आपण थंडीत चादरीचा, स्वेटरचा तर आधार घेऊ शकतो, मात्र बर्फाळ प्रदेशातील प्रण्यांची अवस्था काय होते ते या व्हिडिओतून दिसून येत आहे.
दोन पायवर चालणार कुत्रा व्हायरल
या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता सर्वत्र बर्फाची चादर पसरली आहे. यातून एक कुत्रा जाताना दिसून येत आहे. मात्र तो चक्क पुढच्या दोन पायवर चालतोय, कारण थंडीत त्याचे मागचे दोन पाय गारठले आहेत. हा कुत्रा थंडीला एवढा वैतागला आहे की, त्याला मागचे दोन पायही टेकवत नाहीत. त्याचा हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांच्या क्रिएटिव्हिटीलाही धुमारे फुटले आहेत, कारण नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ तुफान व्हायरल केला आहे. आणि या व्हिडिओवर भन्नाट कमेंट केल्या आहेत.
Cold.. cold.. cold.. ? pic.twitter.com/uGvHjrfwg9
— Buitengebieden (@buitengebieden_) December 30, 2021
सोशल मीडियावर प्राण्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. या व्हिडिओला आतापर्यंत एक लाख लोकांपेक्षाही जास्त लोकांनी पाहिले आहे. हा व्हिडिओ ज्या पेजवरून अपलोड झाला आहे, त्या पेजवरून प्राण्याचे अनेक व्हिडिओ सतत शेअर केले जातात. Buitengebieden नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. काही लोकांना हा कुत्रा डान्स करतोय असेच वाटत आहे. त्यामुळे या व्हिडिओची जोरदार चर्चा आहे.